आशाताई बच्छाव
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना 2024/25 मध्ये निवड झालेल्या. चाळीसगाव, प्रतिनिधी विजय पाटील
जळगांव,धुळे, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यातील लाभार्थ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास परीक्षेत्र बिलाखेड तर्फे दि. 6 ते 16 फेब्रुवारी पर्यंत देण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन तालुक्यातील बिलाखेड येथील गणराज लॉन्स येथे पार पडले.
दीप्रज्वलन कार्यक्रमाचे
अध्यक्ष डॉ.धर्माधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त नाशिक यांच्या हस्ते करण्यात आले.
सेवा निवृत्त सहाय्यक आयुक्त डॉ. शहाजी देशमुख, लाभार्थी सुनिता आगोणे यांच्याहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमास डॉ. देशमुख, बिलाखेड येथील प्रक्षेत्र व्यवस्थापक विजयकुमार बनसोडे यांनी प्रशिक्षणार्थी लाभार्थ्यांना शेळी, मेंढी विषयक मार्गदर्शन केले, यावेळी मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संदीप देवरे, अरुण पाटील, प्रविण पाटील यांनी परिश्रम घेतले. आभार बिलाखेड येथील सहाय्यक लिपिक.सौ. गुरव मॅडम यांनी मानले.