आशाताई बच्छाव
चाळीसगाव मध्ये 4 घरांना आग – लाखोंचे नुकसान
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- शहरातील नागद रोडवरील एच एच पटेल तंबाखू कारखाना शेजारील झोपडपट्टी मध्ये दि 7 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास शॉक सर्किटमुळेे आग लागून चार घरे जळून खाक झाली. आगीचे वृत्त कळातच चाळीसगाव नगरपालीकेच्या अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेत घरातील सिलेंडर बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली व आग विझवली.
एकाला एक लागून पत्र्यांची घरे असल्यसाने चार घरांना आग लागली सकाळी कामानिमीत्त घरातील सर्व पुरूष बाहेर गेले होते. घरात केवळ महिला होत्या. लहान मुलीने घरात आग लागल्याचे पाहील्यावर आरडाओरड केल्याने महिला घराबाहेर पडल्याने बचावल्या.
अग्निशमन दलाला आगीची माहिती मिळताच केंद्रातील अग्निशमन अधिकारी अक्षय घुगे व फायर टीम घटनास्थळी पोहचली.आग विझवतांना टीमला त्या घरातील 3 एलपीजी सिलेंडर ला आग लागल्याचे पाहुन त्यांनी सिलेंडरची आग विझवली व हे सिलेंडर घराच्या बाहेर काढले. अग्निशमन दलाचे अक्षय घुगे,फायर वाहन चालक ईश्वर पाटील,रमेश राठोड, बापू ठाकूर,फायरमन चंद्रकांत राजपूत, संदेश पाटील,राहुल राठोड, नितीन खैरे, विशाल मोरे, सागर देशमुख, शशिकांत चौधरी, फायर कंट्रोल रूम रितेश देशमुख, कपिल पगारे यांच्या पथकाने ही आग विझवली.
या आगीत मुन्ना बेग अहमद बेग, अब्दुल शेख अमिरोद्दीन, कालू खान मुनीर खान, कादर अली सैय्यद अली या चौघांची घरे पूर्णपणे जळून खाक झाली. त्यात संसारपयोगी वस्तु जळून खाक झाल्या. शार्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत एका पाठोपाठ चार घरांना आग लागली.
आग लागल्याची माहिती मिळताच आमदार मंगेशदादा चव्हाण, तहसीलदार प्रशांत पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी नगरसेवक रामचंद्र जाधव, सामाजिक कार्यकर्ते तथा जिल्हा अध्यक्ष भ्रष्टाचार विरोधी मंच रियाज शेख उपस्थित होते.
चाळीसगाव शहरातील नागद रोड परिसरात इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट मुळे लागलेल्या आगीत ४ घरे जळून खाक झाल्याची घटना आज सकाळी घडली. ४ घरांचे संसारोपयोगी व जीवनावश्यक साहित्य आगीत राख झाल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला आहे.
या नुकसंग्रस्तांना माझ्यावतीने पुढील १५ दिवसांचे अन्नधान्य, शिधा देण्यात येईल तसेच सदर घटनेचा पंचनामा करून चौकशी करण्यात यावी व नुकसानग्रस्त कुटूंबांना शासकीय मदत मिळवून देण्याचा सूचना यावेळी प्रशासनाला केल्या.
– आमदार मंगेश रमेश चव्हाण