आशाताई बच्छाव
समुहगान स्पर्धेत साकोली – १ तालुक्यात ठरली नंबर १
तालुका स्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात दमदार प्रदर्शन
संजीव भांबोरे
भंडारा ( जिल्हा प्रतिनिधी)साकोली तालुक्यातील किन्ही/एकोडी
येथे २, ३ व ४ जानेवारी तीन दिवसीय पार पडलेल्या शालेय क्रीडा महोत्सवात साकोली येथील जिल्हा परिषद केंद्र उच्च प्राथ. शाळा गणेश वार्ड क्र. १ ने तालुकास्तरीय समूहगान स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. केंद्रस्तरावर ह्या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन किन्ही (एकोडी) येथे करण्यात आले. यात कबड्डी, वैयक्तिक खेळ, खो-खो, कुस्ती, प्रेक्षणीय कवायत आणि सांस्कृतिक स्पर्धांचा समावेश होता. या स्पर्धेपैकी गणेश वार्ड येथील जि. प. केंद्र. उच्च प्राथ. शाळा क्र. १ ने “छत्रपतीच्या शूर मर्दानो” या समूहगान स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करीत जिल्हास्तरावर आपले नाव रोवले. या समूहगान विजयी चमूत या शाळेतील सानिया शेख, श्रावणी गजापुरे, मोहिनी मेश्राम, यश तिडके, नित्या लांडेकर, तक्ष साखरे, त्रिशा कापगते, भाग्यश्री लांजेवार, भव्य कापगते या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. तालुकास्तरावर शाळेने प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल शाळा मुख्याध्यापक डी. डी. वलथरे, सहा. शिक्षक चेतन बोरकर, एम. व्ही. बोकडे, टी. आय. पटले, शालिनी राऊत, चित्ररेखा इंगळे, श्रद्धा औटी, भुमेश्वरी गुप्ता, आरती कापगते, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष हेमंत भारद्वाज, उपाध्यक्ष हिमा राऊत, सदस्यगण पूनम मेश्राम, वैशाली कापगते, आशिष चेडगे, शिशुपाल क-हाडे, रिता शहारे, दिपाली राऊत, भागवत लांजेवार, दिलीप झोडे, पोषण आहाराचे रेषमा कोवे, छन्नू मडावी, कविता बावणे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करीत पुढील यशासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्यात.