आशाताई बच्छाव
पुस्तकात न मावणारा विषय म्हणजे उत्तुंग व्यक्तिमत्व सावित्री आई फुले — ग्यानचंद जांभुळकर
भंडारा संजीव भांबोरे ब्युरो चीफ
क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांचे व्यक्तिमत्व म्हणजे जगातल्या कोणत्याही पुस्तकात न मावणारे व सामावून घेणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांचे कार्य एवढे महान आहे की जगातल्या कोणत्याही माणसाला त्यांची दखल घ्यावीच लागते. असे प्रतिपादन ग्यानचंद ताराचंद जांभूळकर सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज उत्तान पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र राज्य यांनी रेंगेपार (सातलवाडा) येथे तीन जानेवारी 2025 ला झालेल्या सावित्रीआई फुले यांच्या कार्यक्रमांमध्ये अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्रतिपादन केले कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लीलाधर पटले संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती लाखनी माधुरी कटरे सरपंच खांबा केवळराम बोपचे पोलीस पाटील नितीन वासनिक उपसरपंच शीला बिसेन ग्रामपंचायत सदस्य शैलेश गजभिये कृषी उत्पन्न बाजार समिती लाखनी हे उपस्थित होते.
आपले मत व्यक्त करताना जांभूळकर पुढे म्हणाले की सावित्री आई फुले या देशातल्या पहिल्या शिक्षिका व पहिल्या मुख्याध्यापिका आहेत. विद्येची जननी म्हणजे सावित्रीआई फुले. सावित्रीआई फुले यांचा आदर्श व महापुरुषांच्या आदर्श फुले शाहू आंबेडकरांचा आदर्श ज्या ज्या स्त्रियांनी घेतला व त्याचे पालन केले त्या स्त्रिया आज कलेक्टर, सी ई ओ ,आयपीएस अधिकारी, टीचर, बाबू, कलेक्टर ,राष्ट्रपती, मुख्यमंत्री इत्यादी मोठ्या मोठ्या पदावरून आपले त्यांनी नावलौकिक केलेले आहे. व ज्या स्त्रियांनी फुले शाहू आंबेडकर सावित्रीबाई फुले यांना न मानता पुढे गेल्या त्या भक्तीनी झाल्या. त्या फक्त भक्ती करत राहिल्या म्हणून आज आपल्याला कोणाचा आदर्श घ्यायचे आहे हे आपण ठरवायला पाहिजे. परंतु आजच्या घडीला देखील मोठ्या मोठ्या शिकलेल्या स्त्रिया किंवा नोकरीवर लागलेल्या स्त्रिया यांना आपण विचारले की काय ग बाई तुला नोकरी कशी लागली? तर त्यांच्या तोंडून आपणास ऐकावयास मिळते की व्रत केले,, वैकल्य केले, उपास तपास केले यात्रेला गेले, मरी माय केली, जरी माय केली आणि तेव्हा मला नोकरी लागली हा महापुरुषांचा झालेला अपमान आहे. याची जाणीव आजच्या स्त्रियांनी ठेवायला पाहिजे .
सावित्रीआई फुले म्हणजे त्याग आहे .त्यांनी आपल्या जीवनाचा संपूर्णपणे त्याग केलेला आहे. सावित्रीआई फुले यांनी आपल्या पतीला म्हणजे ज्योतिबाला सुरुवातीपासूनच साथ दिली. आणि म्हणून ते एवढे मोठे होऊ शकले. जगामध्ये फुले दांपत्यासारखं सुंदर व लोकांना आवडणारे दुसरे दाम्पत्य कुठलेही नाही. पूर्वी पती मेल्यानंतर पत्नी विधवा होत असे. तिला विद्रूप केल्या जात असे. तिचे संपूर्ण केस काढून घेतल्या जात असत तिला फक्त पांढरी साडी वापरायला दिले जात असत .मुंडन करण्याची प्रथा सावित्रीआई फुले यांनी बंद केली या प्रथेला त्यांनी कडाडून विरोध केला. व भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये न्हाव्यांचा संप घडवून आणला कोणीही न्हावी स्त्रियांचे केशव पण करीत नसे. इथल्या धर्म मार्तंड व मनुवाद्यांनी याचा विरोध केला की ज्या रूढी परंपरा आहेत त्या चालूच राहिला पाहिजेत. अंधेरा कायम रहे असे त्यांचे म्हणणे होते. समाजामध्ये न्याय स्वातंत्र्य समता आणी बंधुता पसरायला नको. विषमताच राहिली पाहिजे असे त्यांचे मत होते. ज्यावेळेस महाराष्ट्र मध्ये न्हाव्याला संप घडवून आला त्यावेळी लोकांना पोट भरणे कठीण झाले. संसार चालवणे कठीण झाले. पोरा बाळांना शिकवणे कठीण झाले. त्यावेळेस फार मोठा प्रश्न उभा राहिला. ही माहिती जेव्हा इंग्लंडच्या न्हाव्यांना कळली की भारतामध्ये सावित्रीआई फुले व ज्योतिरावांनी संप घडवून आणला व न्हाव्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न उभा राहिलेला आहे त्यांनी तिथून मदत केली व इथल्या नव्यांना त्यांनी इंग्लंडमधून निधी दिला. एवढे मोठे सुंदर कार्य सावित्री आई फुले यांनी केलेला आहे. म्हणून सावित्रीआई फुले म्हणजे त्यागाचा नमुनाच आहे.
कार्यक्रमाला बहुसंख्य गावकरी उपस्थित होते. सुरुवातीला गावातून जयंतीनिमित्त रॅली काढण्यात आली .रॅलीचे रूपांतर नंतर सभेत झाले कार्यक्रमात सर्व जाती-धर्माचे लोक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन माणिक बनकर सर व पवन माने यांनी केले तर आभार प्रदर्शन मुन्नालाल टिकेकर यांनी केले. आभार प्रदर्शनामध्ये टिकेकर म्हणाले की पंधरा वर्षापासून आम्ही सावित्रीआई फुले यांचा जयंतीचा कार्यक्रम साजरा करतो परंतु या वर्षी सारखा अध्यक्षीय भाषण आम्ही कधीच ऐकलेले नव्हते. कार्यक्रमाला रवी कावळे आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी सहकार्य केले.