आशाताई बच्छाव
दुर्दैवी ! नवीन वर्षात नियतीने डाव साधला ! – जालना येथील अपघातात बुलढाण्याचे चार ठार !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा नवीन वर्षाची सुरुवात अपघाताने होत आहे की काय? या विचारानेच उरात धडकी भरत आहे. देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा अपघात झाला आहे. जालन्यातील अपघातात
बुलढाण्याचे चौघे ठार झाल्याने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होतेय. रस्त्यावर थांबलेल्या ट्रकला कारची मागून धडक लागल्याने मोठा अपघात झाला.या अपघातात जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथील चौघे ठार झालेत. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील महाकाळ शिवारात ही घटना घडली.
अपघातातील मृत्यू झालेल्या व्यक्तीसह मुलगा मुलगी आणि चुलत बहीण हे पंढरपूर कोल्हापूर तुळजापूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन केले आणि परत निघताना, नियतीने डाव साधला. यामध्ये भागवत यशवंत चौरे, सृष्टी भागवत चौरे, वेदांत चौरे (अंबड जिल्हा जालना), अनिता परसराम कुटे (संभाजीनगर) असे मृतकांची नाव आहे.