आशाताई बच्छाव
ब्रेकिंग खामगाव हादरलं! फिल्टर प्लांटच्या टाक्यांमध्ये कर्मचारी पडला; तीन तासापासून जीवघेणी झुंज ! अखेर…
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-खामगावमधील जळका भडंग रोडवरील फिल्टर प्लांटवर एक मोठी दुर्घटना
घडली आहे. प्लांटच्या पाण्याच्या मोठ्या टाक्यांमध्ये एक कर्मचारी काम करताना अचानक पडल्याची घटना समोर आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, हा कर्मचारी जखमी झाला असून, तो गेल्या तीन तासापासून टाक्यांमध्ये अडकलेला होता प्लांटवरील इतर कर्मचाऱ्यांनी त्याला वाचवण्याचा शर्थीने प्रयत्न केला आहे, त्याला बाहेर काढण्यात अखेर यश आले आहे
ही दुर्घटना नेमकी कशी घडली, प्लांटमध्ये सुरक्षा व्यवस्थेचा अभाव होता का, याची चौकशी सुरू आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती