Home बीड बीड नगरपालिकेच्या इंजिनिअर वर लाच लुचपतची कारवाई; ०९ लाखाची केली होती मागणी

बीड नगरपालिकेच्या इंजिनिअर वर लाच लुचपतची कारवाई; ०९ लाखाची केली होती मागणी

13
0

आशाताई बच्छाव

1001061673.jpg

बीड नगरपालिकेच्या इंजिनिअर वर लाच लुचपतची कारवाई; ०९ लाखाची केली होती मागणी

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड दि.१८ डिसेंबर २०२४ येथील नगरपालिकेचे इंजिनियर फारोकी अखिल अहमद यांच्यावर नगर परिषद प्रशासन संचालनालयचे आयुक्त तथा संचालक कैलास शिंदे यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. लाच घेतल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आले होते. त्यामध्ये त्यांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी देखील झाली होती. त्या अनुषंगाने नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांनी ही कारवाई केली आहे. बीड नगरपालिकेतील स्थापत्य अभियंता (अतिरिक्त पदभार सहाय्यक रचनाकार) यांना आणि त्यांचे मदतनीस असलेले खाजगी इसम किशोर खुरमरे यांच्याविरुद्ध बांधकाम परवाना देण्यासाठी ०९ लाख रुपये लाचेची मागणी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात दोघांना अटकही झाली होती. त्या अनुषंगाने राज्याच्या नगरपरिषद संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक कैलास शिंदे यांनी अखिल फारोकी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. पुढील आदेशापर्यंत ते निलंबित राहतील, निलंबन कालावधीत फारोकी यांचे मुख्यालय नगर विकास शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय बीड राहील असे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.

Previous articleशालेय विद्यार्थ्यांकरिता नियोजित वेळेत मानव विकास च्या एसटी बसेस सुरु करा-
Next articleभाजपा राष्ट्रीय समर्थक मंचच्या प्रदेशाध्यक्षपदी वसंतराव देशमुख
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here