Home बुलढाणा डरना मना है!’ – पण.. ते कोण आहेत?

डरना मना है!’ – पण.. ते कोण आहेत?

10
0

आशाताई बच्छाव

1001058728.jpg

‘डरना मना है!’ – पण.. ते कोण आहेत?
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-रायपूर ‘हॉरर फिल्म पाहिली की, अंगावर रोमांच येते. रायपूर ग्रामस्थांच्या अंगावर देखील संध्याकाळी सध्या शहारे येऊ लागलेत. सध्याच्या थंडीत शेकोट्या पेटतात.. रात्र झाली की, कुणी तरी कुणाचे दार ठोठावतो आणि काळजात धस्स होते. परंतू ‘डरना मना है!’ हे निश्चित असून, ही भिती यंत्रणाच दूर करू शकते.
रायपूर येथे कडाक्याच्या थंडीने जोर धरला आहे. जागोजागी शेकोट्या पेटलेल्या दिसतात. अशातच रायपूर गावामध्ये, काही मोनोरुग्ण आढळून येत आहेत. ते खरोखरच मनोरुग्ण आहे की दुसरे कोण? असा प्रश्न गावकऱ्यांमध्ये होत आहे. गावामध्ये 2 ते 3
अनोळखी व्यक्ती दिसून येत आहे. ते रात्रीच्या वेळी कोणाच्याही घराचे दार ठोठावतात किंवा थेट घरात प्रवेश करतात. या प्रकारामुळे घरातील लोक गोंधळून जात असून धस्तावले आहेत. त्यांना काही धाडसी लोक हाणून मारून घराच्या बाहेर काढून देताहेत. अशा भयावह प्रकारामुळे घरातील लहान मोठ्यामध्ये अधिकच भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. ह्या व्यक्ती कोण व कुठून आल्या, याबद्दल कोणतीही माहिती नाही. गावामध्ये काही अनुचित प्रकार घडल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण होत आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकाराकडे लक्ष द्यावे, अशी गावकऱ्यांकडून मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here