आशाताई बच्छाव
युवा मराठा महाब्रेकिंग
सुनिल कोल्हे हल्ला प्रकरणात पोलिसांना मोठे यश
मुख्य आरोपी विक्की आव्हाडसह इतर 3 जण ताब्यात
पहिला आरोपी करणची रवानगी जेलमध्ये
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा, 16 डिसेंबर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे मोताळा तालुकाध्यक्ष सुनिल कोल्हे यांच्यावर 25 नोव्हेंबर रोजी प्राणघातक हल्ला झाला होता. या प्रकरणी आज चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात मुख्य आरोपी बुलढाणा जुनागांव परिसरातील मातंगपुरात राहणारा विक्की गणेश आव्हाड असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे आज पकडल्या गेलेल्या आरोपीमध्ये एक जण मोताळा येथील असून 17 वर्षीय युवक आहे. सदर प्रकरणात 13 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजता दरम्यान इंदिरा नगर येथून करण काटकर याला ताब्यात घेण्यात आले होते. करण काटकर ला ताब्यात घेतल्यानंतर त्याने हल्ल्याची कबुली दिली होती. पोलिसांनी त्याच्याकडून सर्व आरोपी बाबात माहिती मिळवली आणि त्या दृष्टीने चक्र फिरवल्यानंतर तीन दिवसांतच चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये विक्की गणेश आव्हाड (वय 30), त्याचा भाऊ रवी गणेश आव्हाड, अमोल सुनील अंभोरे (23) आणि एक मोताळा येथील 17 वर्षीय युवक आहे. सदरची कारवाई बोराखेडी पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने पार पाडली. करण काटकरची रवानगी जेलमध्ये झाली आहे. आज पकडलेल्या आरोपीना उद्या न्यायालयासमोर उपस्थित करण्यात येईल. हल्ल्यात वापरलेला रॉड अद्याप जप्त व्हायचा असून या 5 जणांनी कुणाच्या सांगण्यावरून सदर हल्ला केला, याचाही तपास करण्याच्या सूचना जिल्हा पोलिस अधीक्षक श्री पानसरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आरोपी विक्की आव्हाड हा काही दिवस बुलढाणा नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव पथकात करार तत्वावर काम करीत होता, अशी माहिती पोलिसांनी युवा मराठा न्यूज दिली आहे.