आशाताई बच्छाव
परभणी पोलिसांच्या अमानुष मारहाणीत मृत्यू पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांवर सदोष मनुष्यवधाच गुन्हा दाखल करा
जाफ्राबाद बंद ठेवून डॉ .आंबेडकर अनुयायांनी घटनेचा केला तिव्र निषेध तहसीलदार डॉ भगत यांना दिले विविध मागण्याचे निवेदन
तालुका प्रतिनिधी जाफ्राबाद मुरलीधर डहाके
दिनांक 17/12/2024
परभणी पोलिसांच्या न्यायालयीन कोठडीत असलेले व पोलिसांच्या मारामुळे मृत्यु पावलेले सोमनाथ सूर्यवंशी या प्रकरणातील दोषी पोलिस व गाव गुंडावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा, सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करा,परभणी प्रकरणातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या या प्रकरणात अटक असलेल्या आंदोलकांची सुटका करा व त्यांच्या वरील गुन्हे मागे घ्या या मागणीसाठी निळ वादळ संघटनेचे वतीने जाफ्राबाद बंद हाक देण्यात आली होती या हाकेस प्रतिसाद देत जाफ्राबाद येथील व्यापाऱ्यांनी दुपारी बारा वाजेपर्यंत आपली दुकाने बंद ठेवून या घटनेचा निषेध केला यानंतर भीमसैनिकांनी तहसीलच्या प्रांगणावर आंदोलन केले यावेळी सरकार हमसे डरती है, पोलीस को आगे करती है ,जोर से बोलो जय भीम दोषीवर कारवाई झालीच पाहिजे अशा घोषणा दिल्या व तहसीलदार डॉ .सारिका भगत यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की कॉबिंग ऑपरेशन प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सिआरपीसी अन्वये चौकशी सेवानिवृत्त न्यायाधीशाकडून न करता सिटिंग न्यायाधीशामार्फत करण्यात यावी,मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना सरकारने ५० लाखाची आर्थिक मदत करून कुटुंबातील सदस्यास शासकीय नोकरी सामावुन घ्यावे तसेच त्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे व पोलिसांच्या कॉबिंग ऑपरेशन मध्ये दलित वस्ती मध्ये झालेल्या घरांच्या नुकसानीची तात्काळ भरपाई करून द्यावी यासह आदी मागण्याचे निवेदन तहसिलदार डॉ. भगत यांना देण्यात आले .
यावेळी निळं वादळ संघटनेचे अविनाश नरवडे काँग्रेसचे सुरेश गवळी नगरसेवक अनिल बोर्डे ॲड विनोद डिगे,कौतिक राऊत, प्रकाश राऊत गुड्डू माघाडे देविदास पैठणे राजु मगरे,विनायक गायकवाड, प्रमोद हिवाळे संजय मिसाळ, राहुल गवई , सर्जेराव हिवाळे, अमोल नरवडे, विलास भांबळे यांच्यासह भीम अनुयायांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती