Home भंडारा तळा ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य श्री दिलीप ढाकणे यांच्या कन्येचा विवाह सोहळा उत्साहात...

तळा ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य श्री दिलीप ढाकणे यांच्या कन्येचा विवाह सोहळा उत्साहात संपन्न

22
0

आशाताई बच्छाव

1001057946.jpg

तळा ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य श्री दिलीप ढाकणे यांच्या कन्येचा विवाह सोहळा उत्साहात संपन्न

संजीव भांबोरे
भंडारा ( जिल्हा प्रतिनिधी )एक बंधन, एक कर्तव्य, एक नवं नातं, एक जाणीव, एक नव्याने जुळणारी रेशीम गाठ ! एक स्वप्न दोन डोळ्यांचं, एक हुरहूर दोन मनांची, एक पाऊल सात पावलांची । खरंच हा उत्सव तरल भावनांचा असा चि सौ का कांचन दिलीप ढाकणे व चिरंजीव तेजस श्रीहरी जाधव यांचा शुभ विवाह उत्साहात पार पडला.
कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आणि गो म वेदक विद्यामंदिर तळाचे मुख्याध्यापक श्री दिलीप ढाकणे यांची ज्येष्ठ चि सौ का कन्या कांचन राहणार ढाकणवाडी, तालुका पाथर्डी हिचा शुभ विवाह श्री श्रीहरी जाधव यांचे द्वितीय चिरंजीव तेजस राहणार किरकटवाडी, पुणे यांच्याशी शनिवार दिनांक १४ डिसेंबर २०२४ रोजी विजय लॉन्स, खरवंडी रोड, पाथर्डी, जिल्हा अहील्यानगर येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. या शुभ विवाहप्रसंगी त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी, सहकारी व तळा तालुक्यातील मान्यवर, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उपस्थिती लावली होती. तळा नगरपंचायतीचे स्वीकृत नगरसेवक श्री लिलाधर खातू, तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त श्री मारुती शिर्के गुरुजी, कार्यकारी मंडळाचे सदस्य श्री महादेव बैकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा नितीन पाटील, प्रा द्यानेकर बी एन, प्रा भुरे टी एन, प्रा कसबे पी पी, प्रा सर्जे व्ही बी, प्रा मचे एन टी, प्रा वाडीकर के जे, प्रा शिंदे बी डी, प्रा जमादार एस टी, प्रा बोळेगावे आय बी, प्रा आंबेगावे डी टी, श्री सुहास वावेकर, पिटसई शाळेचे श्री अरुण खुळपे, श्री मुलाणी सर, श्री भोईर सर, तळा येथील श्री मनीष तळेकर, श्री म्हात्रे, इंदापूरचे श्री पवार सर, शिक्षकेत्तर कर्मचारी श्री पवार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सनई चौघडे, बँडबाजा, डिजेच्या तालावर वऱ्हाडी मंडळींनी ताल धरला होता. तळा तालुक्यातून आलेल्या सर्व मान्यवरांचा श्री दिलीप ढाकणे यांनी यथोचित सत्कार केला. चि सौ का कांचन व चिरंजीव तेजस यांना तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी, प्राध्यापक,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान प्राथमिक विद्यामंदिर तळाच्या शिक्षिका सौ बांगर मॅडम यांच्या माध्यमातून अहील्यानागर जिल्ह्यातील मोहटा देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने सर्व शिक्षकांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here