Home बुलढाणा परभणी घटनेचे बुलढाण्यात पडसाद ! – मलकापूर पांग्रा कडकडीत बंद !

परभणी घटनेचे बुलढाण्यात पडसाद ! – मलकापूर पांग्रा कडकडीत बंद !

15
0

आशाताई बच्छाव

1001056903.jpg

परभणी घटनेचे बुलढाण्यात पडसाद ! – मलकापूर पांग्रा कडकडीत बंद !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली आहे. पोलिसांच्या कोठडीत असलेल्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेचे पडसाद राज्यात उमटत आहे.
त्याचाच एक भाग म्हणून सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापुर पांग्रा येथे आज सोमवारी, १६ डिसेंबर रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला. परभणी येथील घटनेचे पडसाद ठिकठिकाणी उमटत असल्याचे पाहण्यास मिळत आहेत. महाराष्ट्र बंदचे आवाहन केल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी या बंदला प्रतिसाद मिळत आहे. या घटनेच्या निषेधार्थ मलकापूर पांगरा येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. यामुळे गावातील दैनंदिन व्यवहार विस्कळीत झाले. सर्व जाती धर्माच्या लहान मोठ्या दुकानदार, व्यावसायिक, किरकोळ विक्रेते यांनी बंदच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन स्वयं स्फूर्तीने आपापली दुकाने बंद ठेवली.
यावेळी बस स्थानक परिसरात असलेली सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. या घटनेच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या दुदैवी घटनेची सखोल चौकशी करून दोषीवर कडक कार्यवाही करण्याची मागणी यावेळी गावकऱ्यांकडून करण्यात आली. बंद यशस्वी करण्यासाठी मलकापूर पांगरा ग्रामपंचायतचे सदस्य राजू साळवे, कैलास साळवे, दिलीप काकडे, बाळू पवार, रामेश्वर सोनकांबळे, गजानन चरवे, किशोर साळवे, अक्षय मगर, नवनाथ मगर, अर्जुन मगर, विनेश साळवे, अमोल पैठणे, साजिद पठाण, पवन साळवे, नंदकिशोर साळवे, संदीप साळवे, अक्षय साळवे, प्रदीप मगर, बबन राठोड, अभिमान साळवे, सुनील काकडे, विनेश साळवे, सुनील बनसोडे, भीमराव साळवे आदींनी पुढाकार घेतला

Previous articleएंटी करप्शन ब्यूरो ऑफ इंडिया (T) असोशिएशन च्या जिल्हा कार्यालयाचे गडचिरोली येथे उदघाटन
Next articleफोटोग्राफरची आत्महत्या !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here