आशाताई बच्छाव
ब्रेकिंग – मंत्रीपदासाठी जोरदार लॉबींग ! – महायुतीतील खाते वाटपाचा तिढा कायम ! – डॉ. संजय कुटे आघाडीवर ! – वैद्यकीय शिक्षण विभाग व आरोग्य खाते मिळण्याची शक्यता !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :-बुलडाणा नव्या फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याच्या तारखा बदलत आहेत. खाते वाटपाचा तिढा कायम असून आता सूत्रानुसार रविवारी नागपूरात शपथविधी होईल असे संकेत मिळताहेत. सध्याही मंत्रीपदासाठी जोरदार लॉबींग सुरू असली तरी जळगाव जामोद येथील आमदार
डॉ. संजय कुटे यांचे नाव मंत्रिपदासाठी आघाडीवर असून त्यांना वैद्यकीय शिक्षण विभाग व आरोग्य खाते मिळण्याची दाट शक्यता आहे. तर ज्येष्ठ नवनिर्वाचित आमदार चैनसुख संचेती, आमदार श्वेता महाले,
आमदार आकाश फुंडकर मंत्री पदाच्या शर्यती माघारल्याचे बोलल्या जातेय.
मंत्रिमंडळ विस्तारावरुन सध्या महायुतीतील तिढा कायम आहे. खातेवाटप, मंत्र्यांची संख्या यावरून महायुतीमध्ये घोळ पाहायला मिळत आहे. महायुतीत मंत्र्यांची संख्या आणि खातेवाटप यावर एकमत न होऊ शकल्याने विस्तार लांबणीवर पडत आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आता रविवारी नागपूरमध्ये होईल असे सांगितले जातं आहे. मात्र त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. रविवारी दुपारी ४ वाजता नागपुरातील राजभवनात शपथविधी होईल, असे संकेत सरकारी सूत्रांकडून देण्यात आले आहेत.