आशाताई बच्छाव
युवराज छ. संभाजी राजे व राजेंद्र कोंढरे यांनी केले मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचे सांत्वन
जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 14/12/2024
मस्साजोग येथील संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या घटनेने अख्खा महाराष्ट्र हादरला असून, सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्रात सर्वप्रथम जालना येथून मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा महासंघाच्या माध्यमातून या घटनेचा निषेध करण्यात येऊन आरोपींना कठोरात कठोर फाशीच्या शिक्षेसाठी मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठवण्यात आले. आज शनिवार दि. 14 डिसेंबर रोजी युवराज छत्रपती संभाजी राजे आणि मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा मराठा आरक्षणाचे सूक्ष्म अभ्यासक राजेंद्र कोंढरे, चिटणीस गुलाब गायकवाड, अमर पवार, आंबेडकर चळवळीचे नेते दीपक केदार यांनी मयत संतोष देशमुख यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि आरोपींना कठोर शिक्षा होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा धीर दिला.