Home जळगाव अडावद पोलीस ठाण्याचे पो.हे.कॉ. संजय पाटील यांचा रेल्वे अपघातात मृत्यू;

अडावद पोलीस ठाण्याचे पो.हे.कॉ. संजय पाटील यांचा रेल्वे अपघातात मृत्यू;

98
0

आशाताई बच्छाव

1001048662.jpg

अडावद पोलीस ठाण्याचे पो.हे.कॉ. संजय पाटील यांचा रेल्वे अपघातात मृत्यू;

चोपडा जळगाव प्रतिनिधी: सुरेंद्र बाविस्कर

चोपडा तालुक्यातील अडावद पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल संजय आत्माराम पाटील ( वय ५१वर्षे) यांचा दूर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून रेल्वे अपघातात छिन्नविछिन्न परिस्थितीत असलेल्या मृतदेहाची ओळख आज नातेवाईकांकडून पटल्याने शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे.या घटनेचे वृत्त चोपडयात येऊन धडकताच सर्वत्र शोककळा पसरली आहे.
याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की,दि.१२/१२/२०२४ रोजी दुपारी ४:३०वाजेच्या सुमारास टाकरखेडा अमळनेर च्या मधील भागात अमळनेर नजीक मालधक्का रेल्वे पटरीवर एका ईसमाची बॉडी, चेहरा छिन्नविछिन्न अवस्थेत रेल्वे पोलिसांना मिळून आली. सदर बॉडी अमळनेर पोलिसांकडे सोपविण्यात आल्यानंतर बॉडीची ओळख पटविण्याचे काम सुरू झाले व मृतदेह ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला. .पोलिस तपास सुरू असतांनाआज चोपडा शहर पोलिसात मिसिंग गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या नातेवाईकांकडे पोलिसांनी सदरील बॉडीची खात्री केली असता मयताचे कपडे व चप्पल वरुन पोलिस कॉन्स्टेबल संजय पाटील यांची बॉडी असल्याचे त्यांच्या पत्नीने ओळखले. यावरून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात जाऊन खात्री केली असता पत्नीने आपल्याच पतीचा मृत्यू देह असल्याचे स्पष्ट केले.यानंतर शवविच्छेदन होऊन बॉडी नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आलेली आहे.याबाबत अमळनेर स्टेशन मास्तर यांच्या खबरीवरून पोलिसात गुरनं क्रमांक १२६/२०२४अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोहेकॉ गणेश पाटील हे करीत आहेत.
पोलिस कॉन्स्टेबल संजय पाटील हे चोपडा येथील महावीर नगरातील रहिवासीअसून ते शांत व मनमिळाऊ स्वभावाचे होते
त्यांनी चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशन, अमळनेर पोलिस स्टेशन, सध्या अडावद पोलिस ठाणे याठिकाणी उत्कृष्ट सेवा बजावली आहे .त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,मुलगी असा परिवार आहे.

Previous articleशिक्षण क्षेत्रात मोठ्या बदलाची आवश्यकता – अनंत पाटील (
Next articleसरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यावर कठोर कारवाई करा – मराठा महासंघ
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here