आशाताई बच्छाव
संविधानाची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करा:- वंचित बहुजन आघाडीची मागणी
जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )परभणी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोरील प्रतीकात्मक संविधानाची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकावर कठोर कारवाई करून शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर लाठचार्जचा आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यास निलंबित करावे. तसेच भीम सैनिकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे. या करिता विविध सामाजिक संघटनांकडून तहसीलदार साकोली यांचे मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र शासन मुंबई यांना वंचित बहुजन आघाडी भंडारा जिल्ह्यातर्फे निवेदन देण्यात आले.
निवेदन राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य एडवोकेट सुजाता वालदेकर व वंचित बहुजन आघाडी भंडारा जिल्हा अध्यक्ष डी जी रंगारी यांच्या नेतृत्वात
देण्यात आले
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्व विकसित देशांच्या राज्य घटनांचा अभ्यास करून देश स्वतंत्र झाल्यानंतर सर्व समावेशक संविधान तयार केले. संविधानाच्या माध्यमातून देशाचा कारभार चालत असून तो एक राष्ट्रीय ग्रंथ आहे. संविधानापासून शोषित, पिडीत, शेतकरी, कामगार व महिलांना त्यांचे हक्क व अधिकार मिळाले आहेत. येणाऱ्या पिढ्यांना संविधान निर्माते व संविधानाचे महत्त्व कळावे. याकरिता देशासह परदेशातही ठिकठिकाणी विश्र्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे तयार करून हातात संविधान अथवा पुतळ्यासमोर प्रतीकात्मक संविधान ठेवले जाते. परभणी येथे संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तयार करण्यात आला व समोर प्रतीकात्मक संविधान ठेवण्यात आले. पण काही समाजकंटकांनी या संविधानाची तोडफोड करून सामाजिक तेढ निर्माण केली. या बाबद समजताच शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग घटनास्थळी उपस्थित होऊन शांततामय मार्गाने निषेध करणे सुरू होते.
प्रतीकात्मक संविधानाची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकावर कठोर कारवाई करण्यात यावी. शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या भीम सैनिकांवर लाठीचार्जचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यास निलंबित करावे. तसेच भीम सैनिकांवर दाखल गुन्हे मागे घेण्यात यावे. या करिता विविध सामाजिक संघटनांचे वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र शासन मुंबई यांना जिल्हाधिकारी भंडारा मार्फत निवेदन पाठविण्यात आले आहे. याप्रसंगी राष्ट्रीय कार्यकारिणीची सदस्य एडवोकेट सुजाता वाल्हेकर, वंचित बहुजन आघाडी भंडारा जिल्हाध्यक्ष डी जी रंगारी , युवा जिल्हाध्यक्ष दीपक जनबंधू , महीला जिल्हा अध्यक्ष तनुजा नागदेवें ,जिल्हा उपाध्यक्ष डॉ सुनील जिवंनतारे, अरुण गोंडाने डॉ,अविनाश नान्हे, सुरेश खंगार, दिगंबर रामटेके, अजित कुमार गजभिये, राहूल गजभिये,राधेश्याम कावळे, संगदीप देशपांडे ,दिना रंगारी, नरेंद्र अंबादे, रक्षित बारसागडे विलास मेश्राम प्रकाश फुले, दुर्गेश मेश्राम ,सचिन रामटेके, नरेंद्र अंबादे, जगदीश रंगारी व असंख्य कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते.