आशाताई बच्छाव
BREAKING! चहा शौकींनांनो चहा प्या.. पण कागदी कपातून नव्हे ! -कलेक्टर साहेबांनी दिले कागदी चहा कपांवर बंदीचे आदेश ! – नगर पालीकाची प्लास्टिक वापरावर निर्बंध घालण्याची व्यूव्हरचना!
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा कॅन्सर सारख्या आजारांना कारणीभूत असलेल्या चहाच्या कागदी कपावर त्वरित बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केले आहे. तर नगरपालिकेने सुद्धा प्लास्टिक वर बंदी घालून दंडात्मक कारवाईचे हत्यार उपसणार असल्याचे ‘युवा मराठा ‘ ला सांगितले आहे.
बाहेर खाण्या पिण्याच्या सवयी वाढल्या आहेत. चहा शौकीनां साठी तर धोक्याची घंटा आहे, पेपर अथवा प्लास्टिकच्या कपामधून पदार्थांचे सेवन केले, करत असाल तर लवकरच कॅन्सर सारखा आजार होऊ शकतो. एखाद्या कॅफे असो अथवा कोणताही चहाचा स्टॉल, टपरी अशा बऱ्याच ठिकाणी पेपर नाहीतर प्लास्टिक कपांचा वापर केला जातो. दरम्यान
बुलढाणा जिल्हाधिकारी यांनी कॅन्सर सारख्या आजारांना कारणीभूत असलेल्या चहाच्या कागदी कपावर त्वरित बंदी घालण्याचे आदेश सर्व विभाग प्रमुखांना निर्गमित केले आहे.
• धोका पत्करण्याची सवय झालीय !
आज पर्यंत सोशलमीडियाच्या माध्यमातून यामुळे होणाऱ्या दुष्परिणामातून कॅन्सर सारखे धुर्दर आजर होत असल्याचे अनेक व्हिडीओ, पोष्ट पहिल्या असुन आपण धोका पत्करतो, एक कप चहातून पंचवीस हजार मायग्रेन प्लास्टिक आपल्या पोटात जाते रोज चार कप म्हटले तरी एकलाख मायग्रेन दररोज पोटात जाणारे प्लास्टिक येणाऱ्या सहामहिन्यात तुम्हाला
आजारी पडण्यास कारणीभूत ठरू शकते. सध्या अशा रुग्णांची संख्या वाढत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
• नपाची प्लास्टिक वापरावर निर्बंध घालण्याची तयारी !
प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची देखील जिल्ह्यात अंमलबजावणी होणार असल्याचे नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. मॉलसारख्या मोठ्या आस्थापनांमध्ये या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांविरोधात कारवाई होईल. त्यानंतर दुकाने, बाजारपेठा, फेरीवाले यांच्याकडे लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
• या प्लास्टिकवर पूर्ण बंदी !
प्लास्टिकपासून बनवल्या जाणाऱ्या पिशव्या (हँडल असलेल्या, नसलेल्या) थर्माकॉल व प्लास्टिकपासून बनवण्यात येणाऱ्या एकदाच वापरल्या जाणाऱ्या डिस्पोझेबल वस्तू. उदा. ताट, कप्स, प्लेटस, ग्लास, काटे, वाटी, चमचे, भांडे इत्यादी. हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरली जाणारी भांडी व वाट्या, स्ट्रॉ, नॉन वोवन, पॉलिप्रॉपीलेन बॅग्ज इत्यादी. द्रव्य पदार्थ साठवण्यासाठी वापरात येणारे प्लास्टिक पाऊच, कप. थर्माकोल व प्लास्टिकचा वापर सजावटीमध्ये करण्यास मनाई आहे.