Home सामाजिक माणूस झाला सस्ता,बकरा महाग झाला पैसेने सबको खा डाला!

माणूस झाला सस्ता,बकरा महाग झाला पैसेने सबको खा डाला!

30
0

आशाताई बच्छाव

1001042039.jpg

माणूस झाला सस्ता,बकरा महाग झाला पैसेने सबको खा डाला!
आज जरा सहज सुचलं म्हणून लिहावंस, वाटलं! कविवर्य नारायण सुर्वे यांच्या कवितेतील या ओळी आज समाजात घडणाऱ्या गोष्टी बघितल्या तर तंतोतंत लागू पडतात असंच आता वाटायला लागलं आहे.आज माणसापेक्षा बकरा महाग झाला तर माणसाला किडया मुंग्याची अवस्था प्राप्त झाली.जो माणूस आयुष्यभर ज्यांच्यासाठी धावाधाव करतो, माझं माझं करतो.अखेर त्याला सुध्दा थोडं काही झालं तरी मग तो घरातल्या आपल्या माणसांनाही बोजा वाटायला लागतो.आपण आयुष्यभर ज्यांच्यासाठी खस्ता खात फिरतो.अनेक प्रकारे काबाडकष्ट करून त्यांचे संगोपन करतो, त्यांना तरी खरे अर्थाने आपले महत्त्व व किंमत असते का? तर त्याचे उत्तर “नाही” हेच असते.आजकाल माणूस चंगळवादी जीवन जगायला शिकला.छानछोकीचे जीवन मौजमजेत जगण्यातच खरी धन्यता समजू लागला.पण…जीवन हे क्षणभंगुर आहे, हे वास्तवस्ता सत्य माणूस कधी स्विकारायलाच तयार नाही.हि फक्त शोकांतिकाच नाही तर दुदैव आहे.आपण समाजाच्या भल्यासाठी वेळ ,काळ न बघता फक्त धावाधाव करून समाजातल्या दीन दुखितासाठी लढायचे, शेवटीं आपल्यावर दुःखआले,संकट आली, अडचणी आल्यात तरी अशी किती माणसं आपल्यासाठी प्रामाणिक पणाने धावाधाव करुन निरपेक्ष अपेक्षेने खंबीरपणे पाठीशी उभी राहतात.तर त्याचे उत्तर म्हणजे अगदी बोटावर मोजण्या इतके विरळच असते.जे खरोखरच आपल्यासाठी धडपडतात तीच तर खरी आपली कमावलेली धनसंपत्ती पेक्षाही अनमोल माणूसकीची संपती असते.अशी माणसं प्रत्येकाच्याच नशिबी येतील असंही नाही.म्हणून आहे त्या परिस्थितीत जगायला शिका व माणूस धर्म जोपासायला शिका यातच खरा जीवनाचा अर्थ दडलेला आहे.मी या सगळ्या गोष्टींचा २ डिसेंबर पासून गहन असा अभ्यास केला.आपण चांगले असलो,तर सगळ्यांसाठी २४ तास हजर असतो.पण आपल्यावर कधी काळी काही प्रसंग गुदरलाच तर मग मात्र आपण ज्यांना माझं माझं म्हणतो ते सुद्धा पाठ फिरवून निघून जातात.त्यामुळे माणसाने निदान माणसासारखे वागून “जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह झिजविती परोपकारी”हे ध्येय मनाशी बाळगून कार्यरत राहिले पाहिजे.नाही तर आजकाल माणसांची किंमत खरोखरच बकर्यापेक्षा कमी झाली आहे.याचे हे ज्वलंत उदाहरण आहे.मी तर संकल्पच केला आहे की, माझ्या दुःखातून मी सावरल्यावर लगेचच महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यात व कोणत्याही परिसरात जेथे दोन अडीच एकर जागा माझ्या संस्थेला दानरूपाने अथवा बक्षीस म्हणून मिळेल तेथेच मी आश्रयआशा सेवाश्रम स्थापन करून गोरगरीब,दीनदुखिताची सेवा करणार आहे.त्यांच्या राहण्याची सोय, खाण्यासाठी व्यवस्था व आयुष्याची संध्याकाळ त्यांच्या सोबतच घालविणार आहे.नरातच नारायण शोधून मानवसेवा हिच ईश्वर सेवा यास प्रथम प्राधान्य आपल्या सगळ्यांच्या आशिर्वादाने व सहकार्याने देणार आहे एवढे मात्र निश्चित!

राजेंद्र पाटील राऊत
संस्थापक अध्यक्ष आश्रयआशा फाऊंडेशन महाराष्ट्र

Previous articleसर्व संविधान प्रेमींच्या वतीने आज देगलूर बंद ची हाक.
Next articleजालन्यात परभणी घटनेचा निषेध संबंधीत आरोपीविरूध्द देशद्रोहाचा गुन्हा नोंदवा- दांडेकर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here