Home जालना माहोरा येथील श्री छत्रपती शिवाजी प्रा.आश्रम शाळेचा माजी विद्यार्थी दीपक वाघ यांची...

माहोरा येथील श्री छत्रपती शिवाजी प्रा.आश्रम शाळेचा माजी विद्यार्थी दीपक वाघ यांची जिल्हा न्यायालय नाशिक येथे लिपीक पदावर निवड

218
0

आशाताई बच्छाव

1001033672.jpg

माहोरा येथील श्री छत्रपती शिवाजी प्रा.आश्रम शाळेचा माजी विद्यार्थी दीपक वाघ यांची जिल्हा न्यायालय नाशिक येथे लिपीक पदावर निवड
तालुका प्रतिनिधी जाफराबाद- मुरलीधर डहाके
दिनांक 10/12/2024
माहोरा येथील श्री छत्रपती शिवाजी प्रा. आश्रम शाळेचा माजी विद्यार्थी दीपक जयवंता वाघ या तरुणाची जिल्हा न्यायालय नाशिक येथे कनिष्ठ लिपिक पदावर निवड झाली आहे. अतिशय सामान्य परिस्थिती असलेल्या शेतकऱ्याचा मुलगा स्वकष्टाच्या आणि सातत्या च्या बळावर आज शासकीय सेवेत निवड झाला आहे.ज्या शाळेत शिकला त्याच शाळेत मानधन तत्वावर शिक्षक म्हणून सेवा करत असताना … अश्यात शासकीय सेवेत निवड झाल्याने समाजातील सर्व स्थरामधून दीपक चे अभिनंदन आणि कौतुक होत आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री श्री रावसाहेब पाटील दानवे, सचिव मा. आमदार श्री संतोष पाटील दानवे, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री संदीप साबळे सर,यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
श्री छत्रपती शिवाजी प्रा. शाळेचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी पुष्प गुच्छ देऊन दीपक वाघ यांचे अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here