आशाताई बच्छाव
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त
भाजपा जालनाच्या वतीने अभिवादन
जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) : – भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस भारतीय जनता पार्टी, जालनाच्या वतीने भाजपा जिल्हा कार्यालय व मस्तगड येथे भाजपा जालना महानगराध्यक्ष सतीष जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी महानगराध्यक्ष सतीष जाधव म्हणाले की, भारतातील असमानतेच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे भरीव योगदान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. सर्वांना शिक्षणाच्या समान संधी मिळाव्यात यासाठी सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेरणादायी ठरले. डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा वारसा त्यांच्या साहित्य, कार्य आणि संविधानरुपात संपूर्ण देश जपतो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही जगण्याच्या एक नवा दृष्टिकोन व दिशा देतात. आजच्या महापरिनिर्वाणदिनी या ज्ञानसूर्यास कोटी कोटी वंदन.
याप्रसंगी भाजपा जालना महानगराध्यक्ष सतीष जाधव, जिल्हा सरचिटणीस सिद्धिविनायक मुळे, सिद्धेश्वर हजबे, महेश निकम, सुनील पवार, सुभाष सले, सुमीत सुरडकर, रामलाल जाधव, राजू गवई, अभिजित अंभोरे, शरद सोनुने, जगदीश येनगुपटला, सागर वाहुळकर, स्वीय सहायक गोवर्धन कोल्हे, राजेश जोशी, मुकेश राठोड, महेश मुळे, मदन गवारे, कैलास सोळुंके, गोवर्धन उबाळे, शाम उगले, गोविंद चौरे, लक्ष्मण वर्मा, विठ्ठल नरवडे, इत्यादीसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.