आशाताई बच्छाव
जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्सवात संपन्न
जालना, दि.6 (जिमाका) : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व युवा कार्यक्रम मंत्रालय भारत सरकार अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद आणि नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सव 2024-25 उत्सवात संपन्न झाला.
येथील शासकीय ओद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयोजित जिल्हास्तर युवा महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते पार पडले. यावेळी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल सूर्यवंशी, शाहीर रामानंद उगले , जिल्हा क्रीडा अधिकारी संजय गाढवे, जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर प्राचार्य आयटीआय कॉलेज प्राध्यापक डॉ. प्रवीण उखळीकर जिल्हा समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना प्राध्यापक डॉ. सोमीनाथ खाडे क्रीडा अधिकारी डॉ. रेखा परदेशी ,श्रीमती आरती चिल्लारे, क्रीडा मार्गदर्शक सिद्धार्थ कदम, राहुल गायके आदी उपस्थित होते.
या जिल्हास्तरीय महोत्सवांमध्ये समूह लोकनृत्य ,समूह लोकगीत, कविता लेखन, कथालेखन ,वक्तृत्व स्पर्धा, विज्ञान व तंत्रज्ञान यामधील नव संकल्पना व युथ आयकॉन इत्यादी बाब असून विजयी स्पर्धकांना रोख पारितोषिक प्रमाणपत्र व ट्रॉफी असून यामध्ये प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक काढले आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल गायके , किशोर नावकर, अमर लोंढे , प्रा. शाम चव्हाण ,श्री प्रा. सतीश मगरे आदी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.