Home जालना जाफराबाद परिसरात ढगाळ वातावरणामुळे शेतकरी संकटात

जाफराबाद परिसरात ढगाळ वातावरणामुळे शेतकरी संकटात

61
0

आशाताई बच्छाव

1001014577.jpg

जाफराबाद परिसरात ढगाळ वातावरणामुळे शेतकरी संकटात
तालुका प्रतिनिधी जाफराबाद -मुरलीधर डहाके
दिनांक 05/12/2024
सविस्तर वृत्त असे की जाफराबाद तालुक्यातील जवळपास गहू, हरभरा पेरणी पूर्ण झाली आहे. परणी पूर्ण होऊन पीक नेमकी तासोतास दिसायला लागली आहे. त्यातच आता ढगाळ वातावरणामुळे हरभरा, गहू या पिकावर मोठ्या प्रमाणात रोग पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी आभाळाकडे डोळे लावून चिंतेने बघत आहे.कारण की ढगाळ वातावरणामुळे अळी,करपा असे अनेक रोग पडण्याची दाट शक्यता असते. त्यामूळे शेतकरी हवालदील झाला आहे. थोडाफार पाऊस पडला आहे त्यामुळे दाट धुके येत आहे .अशा परिस्थिती मुळे सुध्दा शेतकरी चिंतातुर झाला आहे. तीन तारखेला मंगलवरला तर सूर्य दर्शन सुध्दा झाले नाही. असे वातावरण जास्त दिवस राहिल्यास शेतकरी जास्तच संकटांत सापडल्या शिवाय राहणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here