आशाताई बच्छाव
किल्लेधारूर तालुक्यातील भोगलवाडी येथील अंगणवाडी बालकांच्या पोषण आहाराची सर्रास विक्री
मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा
बीड/किल्लेधारूर तालुक्यातील भोगलवाडी येथील अंगणवाडी येथे आलेल्या बालकांच्या पोषण आहार चक्क विकण्यात येत असल्याचा गंभीर प्रकार जागरूक नागरिकांमुळे उघडकीस आला आहे. हा पोषक आहार घेऊन जाताना ग्रामस्थांनी रिक्षा पकडला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे आता संबंधित अधिकारी यावर काय कारवाई करणार आहे याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहेत. बालकल्याण खात्याअंतर्गत अंगणवाडीतील बालक आणि स्तनदा माता यांना पोषण आहार कडधान्य गहू सह तेल, मीठ, तिखट, साखर, हळद असे साहित्य शासनाकडून येते. परंतु हे पोषण आहार सर्व लाभार्थ्यांना न देता तो तसाच दाबून ठेवण्यात येतो. याची विक्री काळ्या बाजारात करण्यात येथे अशी चर्चा नेहमीच सुरू असते. पण यावर भोगलवाडी येथे शिका मोर्तब झालं आहे. भोगलवाडी येथील अंगणवाडीतील हे पोषण आहाराचे पाकीट एका धान्य विकत घेणाऱ्याला विक्री केले. हे साहित्य एका पोत्यात भरून तो फेरीवाला चालला असता गावातील काही तरुण व नागरिकांनी रिक्षा थांबून झडती घेतली असता आत मध्ये एका पोत्यात अंगणवाडीतील बालकांसाठी आलेल्या पोषण आहाराची पाकिटे मिळून आली. याचा व्हिडिओ तयार करून नागरिकांनी तो सोशल मीडियावर व्हायरल केला. यामुळे हा गंभीर प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी धारूर चे गटविकास अधिकारी काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे. तर तालुका प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून यातील दोषीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.