आशाताई बच्छाव
वाकडी येथे संजय गरुड महाविद्यालयात जागतिक अपंग दिनानिमित्त अपंग विद्यार्थ्यांचा सत्कार व खाऊचे वाटप
अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचा पुढाकार
जळगाव( संजीव भांबोरे)जामनेर तालुक्यातील वाकडी येथील संजय गरुड महाविद्यालयात आज दिनांक ३ डिसेंबर 2024 ला दुपारी २ वाजता जागतिक अपंग दिनानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष सुधाकर सिंगारे व महिला उपजिल्हा प्रमुख ममता राजपूत यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते .यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका पी. एन. पाटील व सहाय्यक शिक्षक के .पी .गरुड यांनी अपंगाचे आभार मानून त्यांना सहकार्य करण्याची प्रेरणा दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक पाटील यांनी केले. तर आभार आर एस चौधरी यांनी मानले . कार्यक्रम यशस्वी करण्याकरता विजय राजपूत, एकनाथ कोळी, परमेश्वर चौधरी, शब्बीर तडवी, विलास देशमुख, गणेश पाटील ,गणेश सोनवणे, सुधाकर जाधव, सुनील जाधव ,यांनी सहकार्य केले.याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक ,शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते .