आशाताई बच्छाव
अंबाजोगाई तालुक्यातील पुस, जवळगाव, ममदापूर परिसरात बिबट्याचा वावर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा
बीड/अंबाजोगाई दि: २९ नोव्हेंबर २०२४ अंबाजोगाई तालुक्यात एक खळबळ घटना समोर आली आहे. पुस, जवळगाव, ममदापूर परिसरात बिबट्याचा वावर दिसून आला आहे. या घटनेने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. याबाबत प्राप्त माहिती अशी की पूस जवळगाव परिसरात विवेक आटोळे यांच्या शेतात बिबट्या दिसला असून त्याने एका शेळीचा फडसा पाडल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. या चर्चेमुळे परिसरातील ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान बिबट्याचा वावर निदर्शनात येताच या भागातील ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याची दूरध्वनीवरून कल्पना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून अंबाजोगाईच्या वनपाल विजया शिंगोटे (मॅडम) यांनी त्यांच्या पथकासह पुस, जवळगाव परिसराची पाहणी केली. तसेच ग्रामस्थांशी संवाद साधत बिबट्या दिसताच वन विभागाला कल्पना द्यावी असे आव्हान केले. त्यासोबत ग्रामस्थांनी शेतात जाताना सतर्कता बाळगण्याचेही आव्हान त्यांनी केले आहे.