Home सामाजिक मानवतावादी परमस्नेही हितचिंतक देवधर उन्हवणे तथा अण्णासाहेब!

मानवतावादी परमस्नेही हितचिंतक देवधर उन्हवणे तथा अण्णासाहेब!

127
0

आशाताई बच्छाव

1000996308.jpg

मानवतावादी परमस्नेही हितचिंतक देवधर उन्हवणे तथा अण्णासाहेब!
आज २९ नोव्हेंबर २०२४ म्हणजे आमचे परमस्नेही नाशिकचे रहिवासी देवधर उन्हवणे तथा अण्णासाहेब यांचा सेवानिवृत्तीचा निरोप समारंभ त्यानिमित्ताने.,..
जीवनाच्या प्रवासात अनेक प्रकारची माणसे भेटतात त्यापैकी काही माणसं आपल्याला नकोशी वाटायला लागतात,तर काही माणसे आपल्या प्रेमळ व मनमिळाऊ वागणुकीने हृदयात घर करतात.त्यापैकीच एक म्हणजे देवधर उन्हवणे तथा अण्णासाहेब! मुळचे नाशिक येथील रहिवासी असलेले अण्णासाहेब आपल्या नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने मालेगाव तालुक्यातील व-हाणे गावी सुमारे तीस वर्षांपासून वास्तव्यास आहेत.पाणीपुरवठा विभागात नोकरी करीत असताना अण्णासाहेबांनी फक्त नोकरी हाच उद्देश मनाशी न ठेवता, सगळ्यांना आपलेसे करून घेतले.गोड व मृदू भाषिक असलेल्या अण्णासाहेबांचा स्वभाव म्हणजे प्रत्येकाला आपलेसे करून घेणे व शक्य होईल तेवढ्या प्रमाणात सहकार्य करुन अडचणी, समस्या सोडविण्यासाठी मदत करणे हा देवधर उन्हवणे तथा अण्णासाहेब यांचा स्वभाव गुणधर्म अगदी कौतुक करण्यासारखा आहे.अण्णासाहेब व माझा परिचय सन २००५ पासून अगदी जवळून आला.माझ्या नातेवाईकांच्या माध्यमातून झालेला हा परिचय पुढे कायम तसाच अबाधित राहिला.व राहिलं! विविध प्रश्नांवर वेळप्रसंगी मार्गदर्शन करुन त्यातून सामंजस्याने पर्याय शोधून सन्मार्गावर चालण्याची शिकवण अण्णासाहेबाकडून शिकण्या सारखी आहे.माणूसकीतून मानवतावादी ध्येय व धोरणे कशी असतात हे अण्णासाहेब यांनी बहुजन समाजासोबत आपले संबंध दृढ करताना प्रत्यक्ष सिद्ध करून दाखविले.लहान असो किंवा मोठा प्रत्येकाला अण्णासाहेबांनी मानमरातब देऊन सन्मानाचीच वागणूक दिल्याचे मी स्वतः बघितले आहे.त्यामुळे साहजिकच म्हणावेसे वाटते की, फुलाला आपल्या सुगंधाची जाहिरात करावी लागत नाही,त्याचा दरवळच त्याची ओळख असतो.तसेच अण्णासाहेब यांच्या व माझ्या परिचयातील गेल्या काही वर्षातल्या आठवणीतील हे पैलू निश्चितच कायम स्मरणात राहतील.अण्णासाहेब यांचे कार्य व बहुजन समाजाप्रती असलेले प्रेम व मानवतावादी माणूसकीची ध्येय आम्हाला सदैव प्रेरणा देत राहील.आज अण्णासाहेब देवधर उन्हवणे यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने परमेश्वर चरणी एवढीच प्रार्थना करतो की, अण्णासाहेब तथा देवधर उन्हवणे यांना यापुढील आयुष्य सुखा् समाधानाचे व आरोग्यमय जावो याच भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभकामना!
राजेंद्र पाटील राऊत
मुख्य संपादक युवा मराठा
संस्थापक अध्यक्ष आश्रयआशा फाऊंडेशन व-हाणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here