आशाताई बच्छाव
माहोरा येथे ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅकचा गतिरोधक नसल्याने अपघात,
ट्रक ड्रायव्हरच्या सर्कतेमुळे वाचले मोटार सायकल स्वाराचे प्राण.
तालुका प्रतिनिधी जाफराबाद – मुरलीधर डहाके
दिनांक 25/11/2024
जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथील वडाळा चौफुली आणि पेट्रोल पंपा कडे जाणारा रस्ता आहे. या ठिकाणी गतिरोधक नसल्यामुळे अपघाताचे खूप मोठे प्रमाण आहे. दिनांक 24 नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी 4 वाजता ट्रॅक क्रमांक MH16 A 7424 एका मोटर सायकलला वाचविण्याच्या नादात ड्राइव्हर ने प्रसंगावधान साधून मोटरसायकल वाचविण्याचा प्रयत्न करत असताना ट्रक हायम्याक्स पोलवर जाऊन आढळला. सुदैवाने कोणतेही जीवित हानी झाली नाही परंतु चौफुलीवर नेहमीच खूप मोठ्या प्रमाणात वाहने एकमेकांवर आदळण्याचे प्रकार या अगोदरही घडले आहे.तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालुन गतिरोधक लवकरात लवकर बसविण्याची मागणी नागरीका मधून मोठ्या प्रमाणात होत आहे.