Home जालना वालसावंगी येथील किशोर धायडे यांना राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार जाहीर

वालसावंगी येथील किशोर धायडे यांना राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार जाहीर

71
0

आशाताई बच्छाव

1000987561.jpg

वालसावंगी येथील किशोर धायडे यांना राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार जाहीर
तालुका प्रतिनिधी जाफराबाद- मुरलीधर डहाके
दिनांक 25/11/2024
भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील, किशोर मंगलनाथ धायडे, यांच्या घराण्यामध्ये, त्यांच्या आजोबापासून तर आजपर्यंत, संगीतकाला जोपासण्यात आलेली आहे, त्यांचे आजोबा शाहीर हरिभाऊ जाधव, ही एक फार मोठे नामवंत व सुप्रसिद्ध असे अष्टपैलू प्रत्येक क्षेत्रात कलावंत होते, त्यांचाच वारसा त्यांचे नातू हे आजपर्यंत चालवत आहेत, मोठे बंधू विनोद धायडे, हे नाशिक येथे संगीत शिक्षक आहेत, तसेच किशोर धायडे हे, संगीत क्लासचे शिक्षक आहेत, त्यांनी संगीत क्षेत्रामध्ये फार उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल, त्यांना नुकताच, राष्ट्रीय कर्मयोगी हा पुरस्कार जाहीर झालेला आहे, या मिळणाऱ्या पुरस्काराबद्दल, वालसावंगी तसेच भोकरदन तालुक्यातील सर्व कलावंतांच्या वतीने, व विशेष म्हणजे रेणुका नाट्य मंडळ पिंपळगाव रेणुकाई, येथील सर्व कलावंतांच्या वतीने, त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. तसेच जाफराबाद तालुक्यातील सर्व कलावंतांच्या वतीने किशोर धायडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here