Home जालना अर्जुनराव खोतकर यांचा ग्रामीण आणि शहरी भागात डोअर टू डोअर प्रचार

अर्जुनराव खोतकर यांचा ग्रामीण आणि शहरी भागात डोअर टू डोअर प्रचार

18
0

आशाताई बच्छाव

1000950091.jpg

अर्जुनराव खोतकर यांचा ग्रामीण आणि शहरी भागात डोअर टू डोअर प्रचार
जालना विधानसभा मतदार संघास पुन्हा विकासाच्या उंचीवर नेणार-खोतकर
जालना । प्रतिनिधी दिलीप बोंडे-  महायुतीचे (शिवसेना) अधिकृत उमेदवार अर्जुनराव खोतकर यांनी ग्रामीण भागासह शहरी भागात सुध्दा डोअर टू डोअर जाऊन प्रचाराचा धडाका लावला आहे. त्यामुळे सहाजिकच विरोधकांच्या तंबूत घबराहट पसली असून आपण सत्तेवर नसतांनाही ग्रामीण तसेच शहरी भागाचा विकास केला आहे, तर विरोधक मात्र टक्केवारी घेण्यात मशगुल असल्याची टिका श्री. खोतकर यांनी केली आहे.
जालना विधानसभा-101 मतदार संघातील सोमनाथ, राममुर्ती, जळगांव, सो. जळगांव तांडा, मजरेवाडी, सिंधी काळेगांव,  आदी गावांना तसेच शहरातील विविध प्रभागांना श्री. खोतकर यांनी भेटी दिल्या.
श्री. खोतकर यांनी भेटी दिल्या. यावेळी गावकर्‍यांनी त्यांचे फटाके वाजवून जोरदार स्वागत केले. यावेळी बोलतांना श्री. खोतकर म्हणाले की, गेल्या अनेक वर्षापासून आपण समाजकारण आणि राजकारण करीत आहोत, परंतू विरोधकांसारखे घाणेरडे राजकारण कधीच पाहिले नाही. ज्या- ज्या पदावर काम करण्याची संधी मिळाली ते काम अत्यंत प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करण्यात आला. वैयक्तीक आरोग्य बील कमी करण्यासंदर्भात किंवा अ‍ॅडमीशन संदर्भात तसेच शेतकर्‍यांचा पीक विमा मिळवून देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची धरणे आंदोलन, मोर्चे, रास्ता राको अशा अनेक प्रकारचे आंदोलन उभा करुन न्याय मिळवुन देण्याचे काम केले आहे. कुडल्याही प्रकारची तक्रार असू द्या किंवा अडचण ती सोडवण्यासाठी आपण जनतेसाठी चोवीस तास उपलब्ध असतोत. अर्जुनराव खोतकर आणि त्यांच्या मित्र मंडळीनी डोअर टू डोअर जातांनाच वैयक्तीक भेटीवर भर दिला असल्याने त्यांचा विजय निश्चित मानण्यात येत आहे.

Previous articleविकासाचे गाजर दाखवून राज्यात सत्तेत आलेल्या महायुतीतील  मंडळींनी महाराष्ट्र राज्याला केवळ लुटण्याचे काम केले आहे
Next articleयुवा मराठा खळबळजनक ब्रेकिंग वाघजाळ फाट्यावर पकडली एक कोटींची कॅश
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here