Home बीड परळीकरांची बदनामी करणाऱ्यांना मतदानातून धडा शिकवा; ना. धनंजय मुंडे

परळीकरांची बदनामी करणाऱ्यांना मतदानातून धडा शिकवा; ना. धनंजय मुंडे

69
0

आशाताई बच्छाव

1000909025.jpg

परळीकरांची बदनामी करणाऱ्यांना मतदानातून धडा शिकवा; ना. धनंजय मुंडे

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड/परळी दि ३१ ऑक्टोबर २०२४ सातत्याने काही लोक निवडणुकीच्या तोंडावर परळीत गुंडगिरी, दहशत वगैरे शब्द वापरून परळी शहराची व शहरातील नागरिकांची बदनामी करत आहेत. इथे सर्व समाजाचे लोक गुण्या – गोविंदाने राहतात. परळी हे कायम विकसनशील शहर आहे. या शहराची व शहरात राहणाऱ्या नागरिकांची बदनामी करणाऱ्यांना आता जनतेने आता मतदानातून उत्तर द्यावे, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी परळी येथे बोलताना केले आहे. परळी शहरातील भावसार समाज, गोंधळी समाज, गवळी समाज, रावळ समाज तसेच जैन समाजातील बांधवांच्या धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत आज मॅरेथॉन बैठका संपन्न झाल्या. यावेळी धनंजय मुंडे यांनी विविध समाज बांधवांच्या समस्या तसेच मागण्या समजून घेतल्या. समाज बांधवांच्या विविध मंदिरांची उभारणी तसेच सभागृहांच्या उभारणीसाठी जागेसह निधीचे प्रश्न सोडवले जातील. तसेच ज्या ठिकाणी रस्ते व विजेची समस्या आहे, ते प्रश्न निवडणूक क्षमताच प्राधान्याने सोडवले जातील अशी ग्वाही यावेळी धनंजय मुंडे यांनी दिली. तर कधी म्हणतात परळीत बोगस बुथ आहेत, कधी म्हणतात परळीतील लोकांनी बोगस मतदान केले, ईथल्या लोकांच्या भावनांचा व आमच्यावरील प्रेमाचा अनादर करून यांना केवळ परळीकरांची बदनामी साधायची आहे, अशा लोकांना जनतेने मतदानातून धडा शिकवावा असेही पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले. या बैठकांना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी, यांच्यासह सुरेश आण्णा टाक, अयुब पठाण, प्रा. विनोद जगतकर, ऍड. मंजीत सुगरे, दत्ताभाऊ सावंत, चेतन सौंदळे, महेंद्र रोडे, अनिल अष्टेकर यांच्यासह प्रभाकर हजारे, गोपाळ मामा, सारिका तांदळे, विलास उगावे, अरुण अर्धापुरे, बाबू काका तांदळे, गवळी समाजातील मुन्ना बागवाले, नितीन बागवाले, अरुण चिखले, मारुती काळे, बापु शिंदे, संभाजी काळे, बंडू बागवाले, सोनप्पा बागवाले, गोंधळी व रावळ समाजातील जगदीश इगवे, दत्ता हुलदुले, राहुल इगवे, वैजनाथ घोटकर, दीपक सुपले, सचिन मांडे, गणपत इगवे, लिंबाजी ढवळे, रतन मिरगे, नरसिंग मिरगे, गजानन रेणुके यांच्यासह विविध समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleभंडारा जिल्हा कानून व व्यवस्था निरीक्षक पदाचा कार्यभार धर्मेंद्र सिंह भदोरिया यांनी स्वीकारला
Next articleवडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे (
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here