आशाताई बच्छाव
परळी येथील ज्येष्ठ पत्रकार दिलीप बद्दर यांचे निधन
मोहन चव्हाण
उपजिल्हा प्रतिनिधी बीड
बीड/परळी दि: ३० ऑक्टोबर २०२४ रोजी परळीच्या पत्रकारिता क्षेत्रात गेल्या तीन दशकापासून आपल्या लेखणी द्वारे न्याय मिळवून देणारे ज्येष्ठ पत्रकार तथा कट्टर शिवसैनिक दिलीप बद्दर यांचे मंगळवार दि. ३० ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री आठ वाजता निधन झाले. परळी शहरातील सुभाष चौक भागातील रहिवासी असलेले दिलीप बद्दर हे गत तीस वर्षापासून पत्रकारीतेत कार्यरत होते. दैनिक सामनाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या लेखणीचा ठसा समाज मनावर उमटवला याबरोबरच त्यांनी अनेक दैनिकात काम केले परळी शहरातील कट्टर शिवसैनिक म्हणून ते परिचित होते.आपल्या पत्नी शोभना बद्दर यांना नगरसेविका म्हणुन निवडुन आणत सामाजिक कार्य केले. मागील काही महिन्यापासून ते हृदयरोगाने ग्रस्त होते त्यांच्यावर शिर्डी व छत्रपती संभाजी नगर येथे उपचार करण्यात आले छत्रपती संभाजीनगर येथील सिग्मा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. याच दरम्यान मंगळवार दि. ३० ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री आठ वाजता त्यांची प्राणज्योत माळवली ज्येष्ठ पत्रकार दिलीप बद्दर यांच्या निधनाने परळीच्या पत्रकारितेची मोठी हानी झाली असून एक निडर व सच्चा पत्रकार गमावल्याने दुःख व्यक्त होत आहे. दिलीप बद्दर यांच्या पश्चात दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.