Home भंडारा शांतीवन बुद्ध विहार पाथरी (चिचाळ)येथे ध्यानसाधना व व्यक्तिमत्व विकास हिवाळी धम्म शिबिराचे...

शांतीवन बुद्ध विहार पाथरी (चिचाळ)येथे ध्यानसाधना व व्यक्तिमत्व विकास हिवाळी धम्म शिबिराचे 1 नोव्हेंबर पासून आयोजन

86
0

आशाताई बच्छाव

1000905436.jpg

शांतीवन बुद्ध विहार पाथरी (चिचाळ)येथे ध्यानसाधना व व्यक्तिमत्व विकास हिवाळी धम्म शिबिराचे 1 नोव्हेंबर पासून आयोजन

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार पाथरी (चिचाळ )येथे त्रिरत्न बौद्ध महासंघ केंद्र भंडारा धम्म वर्ग पवनी अंतर्गत ध्यानसाधना व व्यक्तिमत्व विकास हिवाळी धम्म शिबिराचे 1 नोव्हेंबर 2024 सायंकाळी 6.30 वाजेपासून तर दिनांक 7 नोव्हेंबर 2024 सकाळी 9 वाजेपर्यंत आयोजन करण्यात आलेले आहे. शिबिराचा खर्च भागविण्यासाठी संयोग राशि प्रत्येकी 800 रुपये ठेवण्यात आलेली आहे .प्रशिक्षणात येणाऱ्या व्यक्तीला लेखन साहित्य सोबत आणावे, संपूर्ण सहयोग राशी भरून संपूर्ण कालावधी करिता प्रवेश निश्चित करावा, उपचाराकरिता औषध सोबत आणावे आणि व्यवस्थापकाकडे विशेष नोंद करावी, शिबिरात मोबाईलचा वापर करता येणार नाही . भगवान बुद्धाचा धम्म सुखाने जीवन जगण्याची कला आहे. आपल्याजवळ कितीही पैसा ,धन, संपत्ती, पदप्रतिष्ठा सत्ता असली तरी बुद्धाच्या मते आपण खऱ्या अर्थाने माणूस म्हणून सुखी जीवन जगू शकत नाही. आणि म्हणून दरवर्षी धम्मवर्ग पवनीच्या वतीने धम्म शिबिराचे आयोजन केले जाते .शिबिराचा विषय मेघीय सुत्त असून या शिबिराला धम्मचारीणी अमोघ श्री चंद्रपूर ,धम्मचारीणी ज्ञासखी नागपूर, धम्मचारीणी अमृतावजी पुलगाव, धम्मचारी अमयरत्न नागपूर, धम्मचारी विमरत्न नागपूर ,मार्गदर्शन करणार आहेत .करिता या शिबिराचा लाभ घेण्याचे आयोजन आयोगातर्फे करण्यात आलेले आहे.

Previous articleवसमत विधानसभेसाठी महायुतीकडून विद्यमान आमदार
Next articleपरळी येथील ज्येष्ठ पत्रकार दिलीप बद्दर यांचे निधन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here