आशाताई बच्छाव
जालना विधानसभेसाठी बाबासाहेब वानखेडे यांची उमेदवारी दाखल
जालना/दिलीप बोंडे ब्युरो चीफ
जालना विधानसभा मतदार संघात सामाजिक कार्यकर्ते व ओबीसी समाज एकता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब शिवाजीराव वानखेडे यांनी अपक्ष सोमवारी (दि.28) उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी त्यांच्यासोबत निलेश वानखेडे, सचिन वानखेडे, रामेश्वर खांडेभराड, सुरेश रत्नपारखे ,रमेश गडकरी, सुरेश मानकस, रमेश गडकरी, बबन उबाळे, संदीप जैवळ आदिंची उपस्थिती होती.
यांनी महावितरण जालना ग्रामीण विभागात काम केले असून, त्यांना जनसेवेची आवड आहे. शेतकरी, कामगार, कष्टकरी व अपंगाचे प्रश्न हाताळून शासन दरबारी सोडवून दिले. बावणेपांगरी, पठार देऊळगांव, तुपेवाडी, जामवाडी, कृष्णनगर, फुलेनगर, अहंकार देऊळगांव, गोदेंगाव, उम्रद आदि गावामध्ये विद्युत वितरणमध्ये वानखेडे यांनी काम केले आहे. कोणत्याही शेतकऱ्यास त्रास न देता प्रामाणिकपणे सेवा केली. 30 जून 2012 रोजी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर त्यांनी गोंदेगाव घाट, वाघ्रुळ घाट असल्यामुळे शासन दरबारी पाठपुरावा केला. तसेच राजुर 132 के.व्ही. व्हावे याकरीता प्रथम मागणी केली. तसेच नुतन वसाहत ते अंबड चौफुली या रस्त्याची दुरावस्था खड्ड्ेच खड्डे पडल्यामुळे 1056 लोकांच्या सह्याचे नियोजन केले होते.
सुशिक्षीत बेरोजगारांना शिष्यवृत्ती वाढवून मिळावी, यासठी ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लागू करावी यासाठी शासन दरबारी निवेदन दिले. तसेच ओबीसी प्रवर्गांना घरकुल योजना देण्यासंबंधी निवेदन सादर केले.