Home भंडारा दिवाळी व मंडई च्या सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी द्या, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक...

दिवाळी व मंडई च्या सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी द्या, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन

352
0

आशाताई बच्छाव

1000902555.jpg

दिवाळी व मंडई च्या सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी द्या, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन

 

 

संजीव भांबोरे

भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)प्रबोधनकार कला साहित्य संघटना भंडारा जिल्ह्याच्या वतीने भंडारा जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
दरवर्षी दिवाळीपासून गावोगावी मंडई चे आयोजन केले जाते व त्यामध्ये सर्व गावातील लोकांच्या मनोरंजन व्हावे व प्रबोधन व्हावे यासाठी रात्री विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यामध्ये संगीत नाटक, तमाशा ,लावणी, दंडार, ऑर्केस्ट्रा असे प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात.
परंतु विधानसभा निवडणूक असल्याने आचार संहिता सुरू आहे अशामध्ये नाटकांना परवानगी देणे बंद असल्याने हजारो कलावंतांवर उपासमारीची वेड आली आहे.
दिवाळी पासून चार महिने आम्ही सर्व कलावन्त कार्यक्रमाच्या भरवशावर वर्षभराचा नियोजन करीत असतो आणि नाटकाला, कव्वाली ऑर्केस्ट्रा लावणी ला परवानगी मिळाली नाही तर
बरेच कलावंतांवर हा अन्याय होईल.
विधानसभा आचार संहिता
निवडणूक सुरू असल्याने जे काही नियम असतील ते नियम लावून परवानगी देण्यात यावी यासाठी आज जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनानिवेदन देण्यात आले. सोबतच लेखक संघटना वडसा यांच्या वतीने सुद्धा निवेदन देण्यात आले.
यावेळी प्रबोधनकार कला साहित्य संघटनेचे जिल्हा अध्यक्ष भावेश कोटांगले, भंडारा तहसील उपाध्यक्ष सुरेंद्र उके, महासचिव सोमप्रभू तांदुळकर, संचालक कलाकार खोब्रागडे, अक्षय मेश्राम, ऑर्केस्ट्रा गायक अमर वैद्य, लेखक असोसिएशनचे किशोर भाग्यवंत, आदेश खेडीकर, साऊंड सिस्टमचे शिवा मस्के , लावणी संघटना चे अध्यक्ष राजेश वासनिक उपस्थित होते.

Previous articleबीड जिल्ह्यातील चौसाळा बायपासवर एसटीचा अपघात; २५ जण जखमी सुदैवाने जीवितहानी नाही
Next articleउमेदवारी अर्ज भरण्यासाठी घनसावंगीत उसळला जनसागर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here