Home जालना १०१ जालना विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार भास्कर मुकुंदराव दानवे यांचा उमेदवारी अर्ज...

१०१ जालना विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार भास्कर मुकुंदराव दानवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

26
0

आशाताई बच्छाव

1000894857.jpg

१०१ जालना विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार भास्कर मुकुंदराव दानवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

निवडणूक निर्णय अधिकारी हरकळ साहेब यांच्याकडे अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल

जालना/ दिलीप बोंडे ब्युरो चीफ –विधानसभा मतदार संघातून विधानसभा निवडणूक २०२४ साठी मा भास्कर मुकुंदराव दानवे यांनी आज गुरुपुष्यामृत दिनी गुरुवार (दि.24) रोजी निवडणूक निर्णय अधिकारी हरकळ साहेब यांच्याकडे आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

श्री भास्कर मुकुंदराव दानवे यांनी अर्ज दाखल करण्याआधी श्री क्षेत्र राजुर गणपती चे दर्शन घेतले तसेच घरून निघतांना त्यांचे औक्षण करण्यात आले. कुटुंबियांनी त्यांना विजयी होण्यासाठी आशीर्वाद दिले. अर्ज दाखल करताना यावेळी त्यांच्यासोबत अशोकआण्णा पांगारकर, सिद्धिविनायकजी मुळे, विमलताई आगलावे, विजयजी कामड हे देखील उपस्थित होते,. यावेळी माजी जि प सदस्य, प स सदस्य, नगरसेवक, सरपंच व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Previous articleजालना विधानसभेची लढत ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती
Next articleरात्री एक ते पहाटे पाच पर्यंत; तब्बल ५६१, अधिकारी कर्मचारी रस्त्यावर अमरावती ग्रामीण पोलिसांचे ऑपरेशन, गुटखा दारू तस्करी रोकली.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here