Home जालना सोयाबीनचे भाव 5500 वरून 3200 रुपये प्रतिक्विंटल, तेलाचे भाव मात्र100 वरून 142...

सोयाबीनचे भाव 5500 वरून 3200 रुपये प्रतिक्विंटल, तेलाचे भाव मात्र100 वरून 142 रुपये. केंद्र व राज्य सरकारच्या संगणमताने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेची लूट-वसंतराव देशमुख राष्ट्रीय उपाध्यक्ष अभाभ्रनिसंस.

34
0

आशाताई बच्छाव

1000889534.jpg

सोयाबीनचे भाव 5500 वरून 3200 रुपये प्रतिक्विंटल, तेलाचे भाव मात्र100 वरून 142 रुपये.
केंद्र व राज्य सरकारच्या संगणमताने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेची लूट-वसंतराव देशमुख राष्ट्रीय उपाध्यक्ष अभाभ्रनिसंस.
तालुका प्रतिनिधी जाफराबाद-मुरलीधर डहाके
दिनांक 26/10/2024
केंद्र व राज्य शासनाने आणलेल्या मोफत योजना म्हणजे शेतकऱ्यां व सर्वसामान्य जनतेसाठी कर्दनकाळ ठरल्या आहेत.यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव नाही आणि 2023च्या खरिप हंगामात 5500रुपये प्रती क्विंटल विकणारे सोयाबीन आज 2024मध्ये 3200रुपये प्रती क्विंटल प्रमाणे विकले जात आहे.मागच्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 2300 प्रती क्विंटल शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे.याकडे सर्वच राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केले आहे.कारण आगामी विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळविण्यासाठी व निवडणूकीत निवडून येण्यासाठी जीवाचे रान करत असल्याने त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विचार करण्यासाठी वेळच शिल्लक नाही.यावरुन राज्यातील सर्वच राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किती गंभीर आहेत याचा प्रत्यय राज्यातील शेतकरी व सर्वसामान्यांना आलाच असेल.100 रुपये प्रती लीटर असणारे सोयाबीन तेल आज 140 रुपयांवर गेले आहे.म्हणजे लिटर मागे 40 इतका दर वाढविण्यात आला आहे.हि कृती म्हणजे शेतकऱ्यांच्या घरावर दिवसा दरोडा टाकण्यासारखीच असल्याचा आरोप अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.वसंतराव देशमुख यांनी केला आहे.
सरकार कोणत्याही पक्षाचे असो ते व्यापाऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेत असते शेतकरी व सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेताना कोणतेच सरकार आजपर्यंत आले नसून केवळ सर्वसामान्य लोकांची दिशाभूल करणे हा एकमेव व्यवसाय म्हणून या राजकारण्यांनी राजकारण सुरू केलेलं आहे. राज्य शासनाने लाडकी बहीण योजना आणून राज्यातील जनतेचा भ्रमनिरास केला आहे. या मोफत योजना आणून कमालीची महागाई वाढवून दिली असून सर्वसामान्यांना जीवन जगणे असह्य झाले आहे. ऐन सणासुदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमालीचे वाढवून दिले आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांचे शेतीमालाचे भाव कमालीचे पाडले आहेत. यामुळे राज्यातील शेतकरी हा आणखी आर्थिक अडचणीत सापडला असून सरकारच्या केवळ वल्गना असून शेतकऱ्यांच्या हिताचे कुठलेच निर्णय सरकार घेत नाही . ज्या शेतीच्या भरवशावर देशाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. त्याच शेतकऱ्यांचे कंबरडे सरकारने मोडले आहे.केवळ शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम हे सरकार आजपर्यंत करत आले असून सरकारच्या व एकुणच राजकीय पुढारी व राजकीय पक्षांच्या बाबतीत सुक्ष्म विचार करून भविष्याचा निर्णय घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे.स्वातंत्र्यापासुन आजतागायत सत्तेवर असो किंवा सत्तेच्या बाहेर सरकार कोणत्याही पक्षाचे असो ते व्यापाऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेत आलेलं आहे.
निवडणूकीच्या तोंडावर मतदारांना वेगवेगळी प्रलोभने दाखवून व खोटी आश्वासने देऊन सत्ता मिळवायची आणि पाच वर्षे सत्ता उपभोगायची जनतेच्या डोळ्यात धूळफेक करायची आणि जनतेच्या पैशावर मौजमजा करायची दहा पीढ्यांची कमाई करायची हा एकमेव गोरखधंदा सर्वच राजकीय पक्षांनी आजपर्यंत केला असून जनतेची फसवणूक केली असल्याचा आरोप अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव देशमुख यांनी केला आहे.

Previous articleजळगाव सपकाळ येथे जुगार अड्डाचा सुळसुळाट.
Next articleकितीही त्रास द्या.. साथ उद्धव ठाकरेंनाच ! शंकरराव गडाख कडाडले; सोनईतील विजय निर्धार मेळाव्यात शिवसेनेची मशाल पेटली
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here