आशाताई बच्छाव
राजेंद्र पाटील राऊत यांची संकल्पना नांदगाव मतदार संघाचा विकास हाच आमचा ध्यास
नांदगाव मतदार संघातल्या व मालेगाव तालुक्यात असलेल्या कौळाणे (निं.) हि राजेंद्र पाटील राऊत यांची कर्मभूमी आहे त्यांचे बालपण खेडेगावातच गेले आहे त्यांचा जन्म २० आँक्टोबर १९७१ रोजी झालेला असून, अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत व गरीबीचे दाहक अनुभवाचे चटके सोसत त्यांनी संघर्ष हेच आपले जीवन समजून वाटचाल सुरु ठेवली ! आज त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रभर मोठा मित्रपरिवार आहे. कुठल्याही पदावर नसलेले राजेंद्र पाटील- राऊत यांनी अनेक जनसामान्यांच्या प्रश्नांवर त्यांना पुरेपूर न्याय मिळवून देण्यासाठी आजवर प्रयत्न केला आहे. कुणाच्याही सुख-दुःखात, अडी-अडचणीत व संकटात धावून जाणारा हा अवलिया खऱ्या अर्थाने जनसामान्यांचा आधारस्तंश ठरला आहे. रोखठोक व स्पष्टवक्ते -पणा आणि अधिका-यांशी मान मरातब ठेऊन वागण्याची पद्धत यामुळेच राजेंद्र पाटील-राऊत गोरगरिबांसाठी झटणारे व लढणारे खरे तारणहार म्हणून ओळखले जातात, नांदगाव मतदार संघातील मनमाड शहरातल्या दलित कुंटूबाचे हडप केलेले घरे राजेंद्र पाटील-राऊत यांनी सोडवून दिलीत. तर जेऊर येथील बुरकूले कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी मंत्रालयासमोर उपोषण करून न्याय मिळवून दिला. मथुरपाडे येथील आदिवासी बांधवाच्या स्माशनभूमीचा प्रश्न सोडविला. गिगाव फाटा ते गिगाव गावापर्यतचा रस्ता डांबरीकरण करण्यासाठी विशेष पाठपुराव करून रस्ता बनविण्यासाठी योगदान दिले, रोझे गावाला व आदिवासी महिला सरपंचाना न्याय मिळवून देण्यासाठी, तेथील हिटलरशाही न मनभानी करणाऱ्या गाम सेविकेची तडकाफडकी बदली केली, व-हाणे गावी वृक्षारोपण केले, निमगाव जेथील वयोवृद्ध महिलेस न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष केला, वडाळी गावी सलग चार महिने वास्तव्यास राहून परिसरातील हिसवाळ, मोहेगाव, एकवई क-ही, नागापुर, माळेगाव कर्यात, भालुर, लोहशिंगवे, मांडवड भागातील मोठा मित्रपरिवार जोडला. तर मोहेगावच्या गायकवाड कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी मोठा संघर्ष करून लढा दिला, कौळाणे जवळील देवीमळा शाळेवर विद्यार्थींना शालेय साहित्य वाटप केले, व-हाणेत सार्वजनिक पाणपोई सुरू केली.तर कोपर्डी येथील अत्याचारीत बालिकाचे घरी भेट देऊन सांत्वना करुन त्या कुटुंबियास सहकार्य करण्याचे अभिवचन दिले.त्याशिवाय सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात असलेल्या ब्रम्हनाळ गावात आलेल्या महापुरात आपतीग्रस्त ठरलेल्या कुटूंबियांना सुमारे तीन लाख रुपयांची अन्नधान्य सह मदत केली. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांना मालेगाव तालुक्यातून सगळ्यात अगोदर पाठींबा जाहीर करण्यात आघाडीवर राजेंद्र पाटील राऊत हे होते.त्यांनी आजपर्यंत विविध आंदोलने करून गोरगरीब जनतेसाठी हक्काचा व न्यायासाठी लढा दिलेला आहे.आज ५३ व्या वर्षी सुध्दा ते एखाद्या तरुणाला लाजवतील अशा पध्दतीने त्यांची वाटचाल सुरू आहे.राजेद्र पाटील राऊत यांना त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा व भावी वाटचालीसाठी मनापासून शुभकामना! लेखन व शब्दांकन – श्रीमती आशाताई बच्छाव संस्थापक सचिव आश्रयआशा फाऊंडेशन संस्था व-हाणे,ता.मालेगाव