Home बुलढाणा नळगंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.. – नळगंगाचे 11 गेट उघडले !...

नळगंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.. – नळगंगाचे 11 गेट उघडले ! -अनेक गावातील घरांमध्ये शिरले पाणी ! – नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा !

41
0

आशाताई बच्छाव

1000841882.jpg

‘नळगंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.. – नळगंगाचे 11 गेट उघडले ! -अनेक गावातील घरांमध्ये शिरले पाणी ! – नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा:- मोताळा तालुक्यातील 5 किलोमीटर अंतरावर असलेला नळगंगा प्रकल्प महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकावर असलेले मातीचे धरण जोरदार पाऊस झाल्याने नळगंगा धरण 100 टक्के भरले असून धरणाचे 11 दरवाजे उघडले आहेत तर नदीकाठच्या गावांना पूर्ण यंत्र कक्षाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
बुलढाणा जिल्ह्यामध्ये नळगंगा नदीवर सर्वात मोठ्या धरणाची निर्मिती करण्यात आली आहे. या धरणातील पाण्याचा मोताळा, नांदुरा व मलकापूर तालुक्यातील जलसिंचनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ होत असतो परंतु अनेक वर्षानंतर नळगंगा धरण 100 टक्के भरल्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. 11 ऑक्टोंबर रोजी हा इशारा देण्यात आला असून धरणातील जवळपास 11 दरवाजे उघडल्यामुळे नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरून मोठे नुसकान झाले आहे. रात्री 11:00 वाजेपासून ते सुमारे साडेतीन पावणे चार च्या सुमारास पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे
बुलढाणा जिल्ह्यातील बऱ्याच नदी नाल्यांना पूर येऊन पूरस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान मळगंगा चे 11 गेट उघडल्यामुळे शेलापुर, तळणी, भोरटेक, पिंपळपाटी, गुसर, दाताळा, निंबारी, वाकोडी, कुंड, तांदुळवाडी, तालखेड, म्हैसवाडी, नरवेल, दसरखेड एमआयडीसी तसेच मलकापूर शहरातील दोन भागातील गाडेगाव, संत रोहिदास महाराज नगर, ज्ञानेश्वर नगर, माता महाकाली नगर, पारपेट, सालीपुरा, गंगेश्वर मंदिर इत्यादी भागांमध्ये अचानक पाणी शिरले त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. परिणामी रोजच्या जीवन उपयोगी वस्तू व खाण्यापिण्याच्या साहित्याची मोठी हानी झाली आहे.

Previous articleसमृद्धीवर’ झोपेची डुलकी ! – अपघातात 3 जण जखमी !
Next articleॲड.जयश्रीताई शेळके यांनी केली शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी….
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here