Home भंडारा लोकहो, अंधश्रद्धा निर्मुलन हेच खरे राष्ट्रप्रेम :- राहुल डोंगरे

लोकहो, अंधश्रद्धा निर्मुलन हेच खरे राष्ट्रप्रेम :- राहुल डोंगरे

32
0

आशाताई बच्छाव

1000827352.jpg

लोकहो, अंधश्रद्धा निर्मुलन हेच खरे राष्ट्रप्रेम :- राहुल डोंगरे

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)जादूटोणा,भूत – भानामती,करणी, मंत्रतंत्र ,चेटूक,चमत्कार,देवी अंगात येणे, जोतीष्य,बुवाबाजी या केवळ अंधश्रद्धा आहेत.या प्रकारांना अशिक्षितांप्रमाने सुशिक्षित सुद्धा नेहमी बळी पडत असतात.यातून समाजात,गावागावात भांडणे निर्माण होवून एखाद्याचा बळी घेतला जातो.अश्या घटना होवू नयेत,यासाठी सरपंच,पोलीस पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष ,अंगणवाडी सेविका,आशा वर्कर,ग्रामसेवक,पटवारी यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.संबधित गावात ही मंडळी अप्रतिम असे समुपदेशन करून गावकऱ्यांच्या डोक्यात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करू शकतात.तर सहजतेने अंधश्रध्देचे निर्मूलन करता येईल.त्यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासा व घटनेची चिकित्सा करा , अंधश्रद्धा निर्मुलन हेच खरे राष्ट्रहित आहे,असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती तुमसर तालुका संघटक , प्रसिद्ध वक्ते प्रा.राहुल डोंगरे यांनी केले.
तुमसर पोलीस ठाणेच्या वतीने व खापा सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाच्या संयुक्त विद्यमाने खापा ‘ येथे आयोजित अंधश्रद्धा निर्मूलन प्रचार – प्रसार समाज प्रबोधन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर घोडेस्वार होते. तर मंचावर प्रमुख अतिथी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समिती तुमसर तालुका सचिव विजय केवट,सहसचिव किशोर बोंद्रे , सल्लागार राजू भाऊ चामट,माजी सरपंच राजकुमार माटे,पत्रकार नाना ठवकर, इंजि.रजत घोनमोळे उपस्थित होते.
राहुल डोंगरे म्हणाले ,शकुन व नवस,गंडेदोरे,ताईत,ग्रहांचे खडे,मंत्र तंत्र यांना सत्याचा आधार नाही. जोतीष्य, हस्तरेखाशास्त्र विज्ञान नाही. अंधश्रद्धा ही समाजाला लागलेली कीड आहे.त्याचे निर्मूलन कसे करता येईल याकरिता प्रा.राहुल डोंगरे यांनी वैज्ञानिक प्रयोगातून अग्नी प्रज्वलित केले.कानाने चिट्टीवरील नावे वाचून दाखविले.जळते कापूर भक्षण करून दाखवले.निंबुतून केस काढून दाखविले. पेचकस द्वारे तांदुळ भरलेला तांबे वर उचलून दाखविले.वैज्ञानिक प्रयोगातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.जादुटोना विरोधी कायदा सुद्धा प्रा.राहुल डोंगरे यांनी ग्रामस्थांना समजावून सांगितला.भंडारा जिल्ह्याचे आय.पी. एस.पोलीस अधिक्षक नुरुल हसन,अप्पर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे , पोलीस निरिक्षक महादेव आचरेकर यांनी या उपक्रमाला चालना दिल्यामुळे अनेकांचे गैरसमज दूर होतील व कुणीही भोंदू बाबांना बळी पडणार नाही व गावा – गावात शांतता प्रस्थापित होईल व वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत होवून आदर्श पिढी तयार होईल असे अपेक्षित आहे. यावेळी सौ. गिता माटे माजी जिल्हा परिषद सदस्य,सौ.ललिता रोकडे,सौ.काजल बिसने,सौ. पदमा वैद्य,सौ.निशा आगाशे, सौ.ममता ठवकर,आशिष रोकडे,राजेश डोंगरे, हवलदार मन्नाडे आदीसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक किशोर बोंदरे यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन व आभार राजकुमार माटे यांनी केले.जिल्हा पोलीस विभागातर्फे राबवित असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन ” प्रचार व प्रसार” कार्यक्रमाची नागरिकांकडून स्तुती केली जात आहे. महिला मंडळाने विशेष पुढाकार घेवून या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल कौतुकही केले जात आहे.हे विशेष!

Previous articleपार्थ विष्णू रगड याची रनिंग स्पर्धेसाठी विभागीय स्तरावर निवड
Next articleदरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंकजाताई मुंडे यांच्या दसरा मेळाव्यांची जय्यत तयारी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here