Home बुलढाणा वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने ऑटोला उडवले ! -4 जण गंभीर !

वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने ऑटोला उडवले ! -4 जण गंभीर !

25
0

आशाताई बच्छाव

1000825415.jpg

वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने ऑटोला उडवले ! -4 जण गंभीर !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-मलकापूर येथील बुलढाणा मार्गावरील मुंधडा पेट्रोलपंपा समोर अज्ञात ट्रॅक्टरने ऑटोला उडवल्याने ऑटो मधील ४ प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना 6 ऑक्टोबरच्या रात्री 9 वाजता घडली आहे. त्यापैकी 3 प्रवाशांना रुग्णालयात उपचारार्थ रेफर करण्यात आले आहे.
मलकापूर मार्गावरून वाळू वाहतूक सुसाट सुरू आहे. 6 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजेच्या दरम्यान मलकापूर ते उमाळी जात असलेला एम एच 28 टी 2804
क्रमांकाच्या ऑटोला अज्ञात वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने धडक देऊन पसार झाल्याची घटना घडली. यावेळी स्थानिक नागरिकांनी जखमी प्रवाश्यांना मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे प्राथमिक उपचार साठी दाखल केले. ऑटो चालक राजेंद्र गिरी वय ४५ उमाळी हा गंभीर जखमी झाला आहे. महिला नौशाद बी शेख युनूस वय ४५ रा. उमाळी व शेख युनूस शेख इस्माईल रा. उमाळी वय ५५ याचे प्राथमिक उपचार करण्यात आले तिन्ही प्रवासी रुग्णांच्या

पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना डॉ. नीरज क्षिरसागर यांनी बुलढाणा रेफर करण्याचे सांगितले. याप्रकरणी मलकापूर शहर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक वर्गे पुढील तपास करीत आहे.

Previous articleट्रॅव्हल्सवर दगड भिरकावला अन् … -काय होता प्लान ?
Next articleअवघ्या 24 तासाच्या आत मोबाईल चोरट्यांच्या बुलडाणा शहर पोलिसांनी आवळल्या मुस्क्या..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here