Home बुलढाणा ट्रॅव्हल्सवर दगड भिरकावला अन् … -काय होता प्लान ?

ट्रॅव्हल्सवर दगड भिरकावला अन् … -काय होता प्लान ?

29
0

आशाताई बच्छाव

1000825408.jpg

ट्रॅव्हल्सवर दगड भिरकावला अन् … -काय होता प्लान ?
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :– देऊळगाव राजा समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या एका ट्रॅव्हल्स वर अज्ञात इसमाने दगड भिरकावला असता चालकासह 3 जण जखमी झाल्याची घटना घडली. अज्ञात इसमाचा दगड भिरकावून मोठा अपघात घडविण्याचा व लुटीचा उद्देश होता की आणखी काही ? याबाबत पोलीस तपास करीत आहेत.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर रात्री अकरा वा. दरम्यान चॅनल नंबर 307.1 जवळील देऊळगाव कोळ ते बीबी कडे जाणाऱ्या ओव्हर ब्रिज पुलावरून समृद्धि महामार्गने जाणारी ट्रॅव्हल्स क्रमांक
एम एच 29 BE 6777 अज्ञात इसमांनी दगड मारला यामध्ये ट्रॅव्हलचा समोरील काच फुटून यामध्ये चालक रुपेश माधव रुडे रा. मांडवा ता डिग्रस व प्रवासी राजेंद्र राठोड वय 43 रा. महाळुंगी तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ व अनिल गवई रा. सारंगपूर वाडी जिल्हा यवतमाळ हे किरकोळ जखमी झाले. चालक सहित दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले. सदरची माहिती प्राप्त होताच तात्काळ महामार्ग पोलीस चे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र राऊत पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल काळुसे, प्रवीण पोळ व महाराष्ट्र सुरक्षा बल चे जवान श्रावण घट्टे, नागरे यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून जखमींवर समृद्धी महामार्गावरील अॅम्बुलन्सचे डॉक्टर वैभव बोराडे यांनी उपचार केले तसेच पोलीस
स्टेशन बीबी चे ठाणेदार संदीप पाटील, पोलीस अमलदार अरुण सानप, चव्हाण, भगवान नागरे व इतर स्टाफ नी सदरील पुलावर आजूबाजूला अज्ञात इसमाचा शोध घेतला असता सदर इसम हे मिळून आले नाही. सदर ट्रॅव्हलचालकांनी प्रसंगावधान दाखवत ट्रॅव्हल सुरक्षित ठिकाणी बाजूला घेतली. जर चालकाचे नियंत्रण सुटले असते तर मोठा अपघात घडून अनर्थ घडला असता. समृद्धी महामार्गावर महामार्ग पोलीस अधीक्षक नागपूर, श्री यशवंत सोळंके यांच्या आदेशाने पोलीस चे दोन वाहने सतत नाईट पेट्रोलिंग करीत असतात. पोलिसाची नजर चुकून सदर घटना घडत आहेत. त्यामुळे पोलिसांनी सतर्क राहायला हवे अशी मागणी होत आहे.

Previous articleघर चलो अभियानातून प्रत्येक घरापर्यंत पोहोचा विजय आपलाच
Next articleवाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने ऑटोला उडवले ! -4 जण गंभीर !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here