Home गडचिरोली घर चलो अभियानातून प्रत्येक घरापर्यंत पोहोचा विजय आपलाच

घर चलो अभियानातून प्रत्येक घरापर्यंत पोहोचा विजय आपलाच

14
0

आशाताई बच्छाव

1000825397.jpg

घर चलो अभियानातून प्रत्येक घरापर्यंत पोहोचा विजय आपलाच

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या उपस्थितीत गडचिरोली विधानसभा क्षेत्रात घर चलो अभियानाचा शुभारंभ

भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते घरोघरी जाऊन सरकारच्या कामांची माहिती देणार

अभियान यशस्वीपणे राबविल्यास हरियाणा प्रमाणेच महाराष्ट्रातही निकाल भाजपाच्या बाजूने राहील- प्रशांतभाऊ वाघरे यांनी कार्यकर्त्यांमध्ये भरला उत्साह

गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ 

भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या क्रांतिकारी निर्णयांची व योजनांची व आमदार म्हणून मी केलेल्या जिल्हा विकासातील कामांची माहिती पार्टी नेतृत्वाने दिलेल्या “घर चलो अभियानाच्या” माध्यमातून घरोघरी पोहोचविल्यास येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपाचाच विजय असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या घर चलो अभियानाच्या शुभारंभाच्या बैठकीला उपस्थित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करताना केले.

यावेळी जिल्ह्याचे अध्यक्ष प्रशांतभाऊ वाघरे , जिल्हा महामंत्री सौ योगिताताई पिपरे, शहराचे अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, गडचिरोली तालुक्याचे अध्यक्ष विलासजी भांडेकर, धानोरा तालुक्याच्या अध्यक्ष लताताई पुंघाटी, भाजपा जिल्हा सचिव दिलीप भाऊ चलाख ,साईनाथ भाऊ बुरांडे, पंचायत समितीचे माजी सभापती मारोतराव इचोडकर, उपसभापती विलासजी दशमुखे , ज्येष्ठ नेते जयरामजी चलाख, तालुक्याचे महामंत्री बंडूभाऊ झाडे ,शहराचे मंत्री महामंत्री विवेक बैस ,नरेश भाऊ हजारे विनोद भाऊ देवोजवार, महामंत्री केशव निंबोड, शहर महिला आघाडी अध्यक्ष कविता ताई उरकुडे, तालुक्याच्या महिला आघाडी अध्यक्ष अर्चनाताई बोरकुटे , धानोऱ्या शहराचे अध्यक्ष सारंग साळवे, नगरसेवक संजू कुंडू यांचे सह विधानसभा क्षेत्रातील तालुका महामंत्री, विविध आघाडीचे अध्यक्ष व महामंत्री प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्ह्याचे अध्यक्ष प्रशांत भाऊ वाघरे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना अभियान यशस्वीपणे राबविण्याचे आवाहन केले .अभियानच्या माध्यमातून आपण घरोघरी पोहोचल्यास हरियाणा प्रमाणेच महाराष्ट्रातही विजय भारतीय जनता पार्टीचा होईल असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

Previous articleअखेर आमदारांचे स्वप्न साकार झाले शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा ९ ऑक्टोबरला पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ सोहळा
Next articleट्रॅव्हल्सवर दगड भिरकावला अन् … -काय होता प्लान ?
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here