Home जळगाव वीर शिरोमणी हिंदूसूर्य महाराणा प्रताप चौक म्हणजे स्फूर्तिदायी स्थान,

वीर शिरोमणी हिंदूसूर्य महाराणा प्रताप चौक म्हणजे स्फूर्तिदायी स्थान,

20
0

आशाताई बच्छाव

1000822199.jpg

वीर शिरोमणी हिंदूसूर्य महाराणा प्रताप चौक म्हणजे स्फूर्तिदायी स्थान,

वीरशिरोमणी हिंदूसूर्य महाराणा प्रताप चौक लोकार्पण सोहळा मंत्री गिरीष महाजन यांच्या शुभहस्ते संपन्न,

आमदार मंगेश चव्हाण यांचे राजपूत समाज बांधवांकडून भरभरून कौतुक तर संकुचित विरोधकांचा केला निषेध.

चाळीसगाव(प्रतिनिधी विजय पाटील)- दि ७ ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता वीर शिरोमणी हिंदूसूर्य महाराणा प्रताप चौक लोकार्पण सोहळा ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या शुभहस्ते मोठ्या थाटात पार पडला. यावेळी आमदार मंगेश चव्हाण, गुजरात येथील भारतीय जनता पक्षाचे निते सुरेशजी मकवाना, महाराणा प्रताप ट्रस्टचे अध्यक्ष ठाणसिंग अप्पा पाटील यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, राजपूत समाज बांधव व पदाधिकारी उपस्थित होते. भारतातील एकमेव चित्तोडगढ येथील विजयस्तंभाची प्रतिकृती शहरात झाल्याने चाळीसगावकरांना आमदार चव्हाण यांनी सुखद धक्का देत विरोधकांना आपल्या विकास कामांचा जोरदार झटका दिला आहे. यावेळी लोकार्पण सोहळ्यात मंत्री महाजन यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या कार्याला साजेसा अतिशय सुंदर आणि देखणा चौक सुशोभित केल्याबद्दल आमदार चव्हाण यांचे कौतुक करत सर्व समाज बांधवाना लोकार्पण सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या. ४० ते ५० दिवसात हिंदुसूर्य महाराणा प्रताप यांचा इतका सुंदर चौक उभा केला आहे. वीर शिरोमणी हिंदुसूर्य महाराणा प्रतापसिंह यांचे शौर्य, त्याग आणि निस्सीम देशप्रेम या स्मारकाच्या रूपाने चाळीसगावकरांना प्रेरणा देत राहील. हे स्मारक फक्त एक चौक नसून, चाळीसगावच्या प्रत्येक नागरिकाच्या हृदयातील एक स्फूर्तीदायी स्थान असेल अश्या भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केल्या. विरोधकांनी अशा ऐतिहासिक कामावर देखील टीका केली असून मोठ्या मनाने विरोधकांनी देखील चांगल्या कामाची प्रशंसा केली पाहिजे होती, मात्र टीका करत विरोधकांनी आपली संकुचित वृत्ती सिद्ध केल्याने उपस्थित सर्व महाराणा प्रेमी यांनी याचा तीव्र निषेध केला.

नुसत बोलबच्चन करून चालत नाही तर कृतीतून बदल घडत असतो – आमदार मंगेश चव्हाण

वीर शिरोमणी हिंदू सूर्य महाराणा प्रताप चौक लोकार्पण पावसामुळे 10 दिवस उशिरा झाल्याने दिलगिरी व्यक्त करतो.मी वचननामा सादर करून एक दोन कामे करून फक्त खोटे आश्वासन देणारा आमदार नसून जे सांगितले ते प्रामाणिक पणे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि जे सांगितले नाही ती देखील कामे केली. या चौकाच्या लोकार्पणाचे माजी लोकप्रतिनिधी यांना आमंत्रण देऊन देखील ते आले नाही उलट आजच्या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देण्याएवजी त्यांनी हा चौक म्हणजे पाप आहे असे बेताल वक्तव्य केले. समस्त राजपूत समाज व महाराणा प्रेमी हा अपमान विसरणार नाही. माजी लोकप्रतिनिधी यांना माजीच ठेवण्याची काळजी समाज घेईल. मात्र मी एवढे सांगू इच्छितो की बोलबच्चन करून काम होत नाही त्यासाठी कृती करावी लागते आणि कृतीतून बदल घडत असतो. आंब्याच्या झाडाला लोक दगड मारतात, काटेरी बाबळीला नाही. जेवढे दगड माराल तेवढा विनम्र होईल. माझ्या शिक्षणावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांचे एवढे शिक्षण असून देखील सत्तेचा व सरकारचा योग्य वापर करता आला नाही. त्यांच्या काळात गाव गाव भकास केले आणि मी विकसित केले हा त्यांच्यातील आणि माझ्यातील फरक आहे – आमदार मंगेश चव्हाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here