Home नाशिक नाशिकला मनु मानसी संस्थेचा पुरस्कार सोहळा संपन्न

नाशिकला मनु मानसी संस्थेचा पुरस्कार सोहळा संपन्न

119
0

आशाताई बच्छाव

1000822192.jpg

नाशिक प्रतिनिधी अँड विनया नागरे – मनु मानसी महिला बहुउद्देशिय सेवाभावी संस्था नाशिक यांच्या वतीने नवदुर्गा पुरस्कार 2024 हा कार्यक्रम 6तारखेला पवार ग्रीन
स्पेसेस, के . के वाघ कॉलेज समोर, औं.नाका , नाशिक येथे घेण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन आणि दुर्गा मातेच्या पूजनाने झाली. नवदुर्गा पुरस्काराचे प्रमुख अतिथी मा. पो. इ. महेंद्र चव्हाण सर मा. कृष्णा मरकडसर, मा. सौ. संगिता दिलीप फडोळ, मा. आरती जैन, मा. आशा ताई पाटील, मा. अरविंद सोनवणे , मा.सौ.ज्योती केदारे हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी सत्कार संस्थेच्या अध्यक्षा सौ. मेघा शिंपी संस्थापिका, श्री.राजेश शिंपी, सचिव, ऍड. विनया नागरे, सौ कविता पाटील, सौ .रचना चिंतावार आणि धनश्री गायधनी यांच्या हस्ते करण्यात आला. प्रमुख अतिथीनी आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये मनु मानसी संस्थेचे सामाजिक कार्य, कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन, कार्य करण्याची पद्धत आणि महिलांनी सक्षम कसे असले पाहिजे यातून व्यक्त केले. मनु मानसी संस्थेच्या अध्यक्षा सौ मेघा राजेश शिंपी यांचा सत्कार करण्यात आला.
मनु मानसी संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांसाठी हा पुरस्कार देण्यात आला. ज्या महिला पाच वर्षा पासून घर आणि नोकरी किंवा आपले कार्य तारेवरची कसरत करून सांभाळत आहेत अश्या 30 महिलांचा नवदुर्गा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ट्रॉफी फ्रेम सर्टिफिकेट, फेटा, ओटी असे पुरस्काराचे स्वरूप होतें.तसेच सर्वांसाठी नाष्ट्याची व्यवस्था देखील केलेली होती.
नवदुर्गा पुरस्काराचे सूत्र संचालन सौ रचना चिंतावार आणि ऍड.सौ. विनया अमित नागरे यांनी केले.
मनु मानसी संस्थेच्या अध्यक्षा सौ मेघा शिंपी, श्री. राजेश शिंपी, ऍड.सौ.विनया अमित नागरे, सौ.कविता पाटील, सौ रचना चिंतावार, धनश्री गायधनी,रुपाली कोठुळे , माधुरी तांदळे ,मीनल सोनवने,मयुरी शुक्ल, श्रुती वानखेडे, सुनिता पाठक, सुरेखा घोलप,यांचे विशेष सहकार्य लाभले. मनु मानसी संस्थेच्या अध्यक्षा सौ. मेघा राजेश शिंपी यांनी सर्व प्रमुख अतिथी आणि नवदुर्गाचे आभार मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
नवदुर्गा पुरस्कार्थीची नावे
मा.डॉ.मनोरमा पाटील,विशाखा खैरनार ,प्रियंका ढोमने ,आशा मुठाळ ,सोनाली थोरात,कविता पाटील,सुचिता भालेराव ,हेमलता वानखेडे,ऍड. सोनाली सुर्यवंशी/सोनवणे,दिपाली नागपुरे,पूनम सावन देवरे ,ॲड. सोनल खैरनार,
अनु प्रविण राणा, मनिषा कोकरे ,
सविता नरेंद्र आहिरे,सौ सुनिता पाठक, डॉ. अश्विनी दाते सौ. रिंकू पाटील सौ. स्मिता आहिरे,सौ. तनुजा गुळवी,डॉ. कांचन वखारे ,सौ नंदा डेरे,सौ. चित्रा गायकवाड, सौ विद्या शहाने,कल्पना भालेराव , वैशाली वाघ , मंजिरी सरोदे, सौ .योगिता बागुल सौ.तक्षशिला निकाळे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here