Home वाशिम खूशखबर! पीएम किसानचा १८वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

खूशखबर! पीएम किसानचा १८वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

17
0

आशाताई बच्छाव

1000819096.jpg

खूशखबर! पीएम किसानचा १८वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा.                                                 वाशिम, प्रतिनिधी निखिल धुत 

केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा १८ वा हप्ता आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधीचा ५ वा हप्ता आज राज्यभरातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दसऱ्याच्या आधी ४ हजार रूपये मिळाले आहे. आज वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा निधी वितरीत करण्यात आला.

दरम्यान, निवडणुकांना समोर ठेवून राज्य सरकारने शेतकऱ्यांचे प्रलिंबित अनुदान, पीक विमा, नुकसान भरपाई, लाडकी बहीण योजना, गायींना अनुदान, दूध अनुदान, पीक कर्जावरील व्याजमाफी, शेतकऱ्यांना मोफत वीजबील, दिवसा वीज अशा अनेक घोषणा आणि निधी वाटप केला आहे.

त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता आचारसंहितेच्या आधीच देण्याची तयारी सुरू आहे. यातच आता पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचाही हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे.

केंद्र शासनाने २०१९ साली शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू केली. या योजनेमार्फत शेतकऱ्यांना वर्षाकाठी ३ हप्त्यात सहा हजार रुपयांचा निधी दिला जातो. या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने दोन वर्षापूर्वी नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली असून, राज्य शासनाकडूनही राज्यातील शेतकऱ्यांना वर्षातून तीन हप्त्यांचे ६ हजार रुपये दिले जातात.

ज्य आणि केंद्राच्या दोन्ही योजनांचे ऑगस्ट २०२४ ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीमधील हफ्ते शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आले आहेत.

Previous articleशासनाने शंभर रुपयाचे मुद्रांक बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा – नाशिक चवरे
Next articleहिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे वरिष्ठ पत्रकारांतर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक प्रवीण शेळके यांचा सत्कार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here