आशाताई बच्छाव
वाशिम,गोपाल तिवारी, ब्युरो चीफ
अजगराने गिळले चक्क नीलगाय चे पिल्लू वनोजा येथे पुन्हा ९ फूट लांबीचा अजगर…..
वाशीम जिल्ह्यातील वनोजा येथील दिलीप गावंडे यांच्या शेतात त्यांना एक मोठा साप दिसून आला.तसेच तो नीलगाय चे पिल्लु गिळत होता पण शेतकऱ्याची चाहूल लागल्यामुळे त्याने भक्ष सोडून बाजूला निघून गेला हे सर्व दृश्य पाहून दिलीप गावंडे यांची भांबेरी च उडाली.यांनतर त्यांनी तत्काळ संबधित माहिती एम. एच. २९ हेल्पिंग हॅण्ड वाईल्ड ऍडवेंचर अँड नेचर क्लब यवतमाळ शाखा वाशिम चे सदस्य व सर्पमित्र तथा वन्यजीव रक्षक शुभम हेकड यांना दिली.यांनतर शुभम लगेच आपले सहकारी शुभम डुकरे यांच्या सह घटनास्थळी दाखल झाले व पाहाणी केली असता.एक अंदाजे ९ फूट लांबीचा अजगर त्यांना सोयाबीन मध्ये नीलगाय चे पिल्लू गिळताना दिसले.यांनतर त्यांनी अतिशय शिताफीने सदर अजगराला सुरक्षित रित्या रेस्क्यू केले.व संबधित माहिती कारंजा – मंगरूळपीर वनपरिक्षेत्राचे वनाधिकारी श्री.अमित शिंदे यांच्या सह वनपाल श्री. सुदर्शन सोनवणे यांना दिली यांनतर वनरक्षक मनिष हुमने यांनी सदर सापाचा रीतसर पंचनामा करून सदर अजगराला निसर्ग अधिवासात मुक्त केले.गेल्या २ महिन्यात या संघटनेच्या सदस्यांनी तब्बल ६ मोठ मोठ्या अजगारांना पडकुन निसर्ग अधिवासात मुक्त केले.१ ऑक्टोबर पासून सुरू झालेल्या वन्यजीव सप्ताहामध्ये अनेक सापांना जीवदान देण्याचे कार्य केले आहे.यामध्ये नाग गवत्या व अजगर सापाचा समावेश आहे.