Home बीड परळीतील विद्यावर्धिनी शाळेच्या विद्यार्थिनीची राष्ट्रीय स्तरावर स्पर्धासाठी निवड

परळीतील विद्यावर्धिनी शाळेच्या विद्यार्थिनीची राष्ट्रीय स्तरावर स्पर्धासाठी निवड

46
0

आशाताई बच्छाव

1000810921.jpg

परळीतील विद्यावर्धिनी शाळेच्या विद्यार्थिनीची राष्ट्रीय स्तरावर स्पर्धासाठी निवड

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड/परळी दि:०२ ऑक्टोंबर २०२४ परळी शहरातील औष्णिक विद्युत केंद्र नवीन वसाहत शिक्षणाचे माहेरघर असलेली विद्यावर्धिनी विद्यालयाची विद्यार्थिनी कु.आभा गणेश मुंडे इयत्ता आठवी मध्ये शिकणारी खेळाडू आहे. पॅरा जलतरण स्पर्धा २०२४-२५ सब ज्युनिअर गटात मध्ये राज्यातून प्रथम क्रमांक मिळवला असून यश संपादन केले आहे. राष्ट्रीय स्तरावर स्पर्धासाठी निवड पॅरा जलतरण स्पर्धा २०२४-२५ सब ज्युनिअर गटात मध्ये राज्यातून प्रथम क्रमांक मिळवला. कल्याण येथे १६ स्टेट पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप २०२४-२५ मध्ये सब ज्युनिअर गटात ५० मि व १०० मि फ्री स्टाइल व २०० मि आय एम स्पर्धा जिंकून , गोवा येथे होणारे २४ व्या नॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिच्या या यशाबद्दल समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कोळगे साहेब, उपाध्यक्ष भिंगोरे साहेब, सचिव इटके साहेब सन्माननीय संचालक पैंजणे साहेब, एम. टी. मुंडे साहेब, चेवले साहेब, मातेकर सर, संजय कराड सर तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांनी तिचे कौतुक केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here