Home बुलढाणा ब्रेकिंग ! सोयाबीन कापण्यासाठी गेलेल्या बापलेकांचा मृत्यू ! -घातापाताचा संशय !

ब्रेकिंग ! सोयाबीन कापण्यासाठी गेलेल्या बापलेकांचा मृत्यू ! -घातापाताचा संशय !

41
0

आशाताई बच्छाव

1000805569.jpg

ब्रेकिंग ! सोयाबीन कापण्यासाठी गेलेल्या बापलेकांचा मृत्यू ! -घातापाताचा संशय !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- लोणार तालुक्यातील खुरामपूर येथील पारधी समाजातील बापलेकांचा करूण अंत झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. शॉक लागून ही घटना घडली असे सांगण्यात येत असले तरी, हा घातापाताचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त होत आहे. बापलेक सोयाबीन सोंगण्यासाठी गेले असता ही दुर्दैवी घटना घडली.
सुनील यंगन पवार व यंगन पवार अशी मृतकाची नाव आहे. दोघे बापलेक खुरामपूर येथील असून ते पारडा दराडे शिवारातील गायरान जमिनीतील सोयाबीन सोंगण्यासाठी गेले होते. परंतु दोघांचा मृतदेह ओढ्यातील वाहत्या पाण्यात आढळला. दरम्यान हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय मृतकांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता

दुपारी चार वाजेपर्यंत नातेवाईकांनी मृतदेह जागेवरून हलवू दिला नव्हता लोणार ग्रामीण रुग्णालयासमोर काही काळ तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी लोणार पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Previous articleअन् माणुसकी गहिवरली ! -अपघातग्रस्त वानरावर विधिवत अंत्यसंस्कार
Next articleलाडक्या बहिणींनी आमदार होळी साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here