Home बुलढाणा अन् माणुसकी गहिवरली ! -अपघातग्रस्त वानरावर विधिवत अंत्यसंस्कार

अन् माणुसकी गहिवरली ! -अपघातग्रस्त वानरावर विधिवत अंत्यसंस्कार

29
0

आशाताई बच्छाव

1000805549.jpg

अन् माणुसकी गहिवरली ! -अपघातग्रस्त वानरावर विधिवत अंत्यसंस्कार..
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :– मलकापूर हिंदू धर्मात हनुमानाचा अवतार अशी धारणा असलेल्या वानराचा चार चाकी वाहनाच्या धडकेत धरणगाव येथे मृत्यू झाला. या तडफडणाऱ्या वानराला पाहून हनुमान
सेनेच्या कार्यकर्त्यांची व गावकऱ्यांची माणुसकी गहिवरली आणि या वानराची विधीवत अंत्ययात्रा काढत त्याचेवर अंत्यसंस्कार केले.

धरणगाव येथे एका चार चाकी वाहनाने वानराला धडक दिली. दरम्यान तडफडणाऱ्या दुखापतग्रस्त वानराला ग्रामस्थांनी वाचविण्याचे प्रयत्न केले परंतु ते निष्फळ ठरले. वानराचा मृत्यू झाल्याने हनुमान सेनेच्या कार्यकर्त्यांनी व गावकऱ्यांनी एकत्रित येत या वानराचा विधीवत अंत्यसंस्कार केला. यावेळी हनुमान सेनेचे सचिन मोळे, निवृत्ती कवळे, वामन कवळे, अमोल पाटील, अमोल मोरे, प्रशांत पाटील व गावकरी उपस्थित होते.

Previous articleमराठेशाहीचा गौरवास्पद इतिहास जतन करण्यासाठी… ‘मोडी लिपी’ प्रशिक्षणवर्ग!
Next articleब्रेकिंग ! सोयाबीन कापण्यासाठी गेलेल्या बापलेकांचा मृत्यू ! -घातापाताचा संशय !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here