Home भंडारा गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू

गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू

46
0

आशाताई बच्छाव

1000804204.jpg

गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) आज दिनांक 2 ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती चे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज व विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून गोसेखुर्द गावातील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्यात याव्यात याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे बेमुदत आमरण उपोषण जोपर्यंत मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत सुरू राहणार असल्याचे गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त समितीचे अशासकीय सदस्य भाऊ कातोरे यांनी सदर प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या प्रमुख मागण्यांमध्ये प्रकल्पग्रस्त नोकरी करिता प्रमाणपत्र देण्यात आले ते 2022- 23 पासून रद्द करण्यात आले ते पूर्ववत करण्यात यावे, वाढीव कुटुंबाला 2.90 लक्ष रुपये ,प्रकल्पग्रस्त प्रकल्प बाधित व अंशतः बाधित यांना देण्यात यावे ,गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त भूमीहीनांना कमीत कमी एक एकर शेत जमीन देण्यात यावी, गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त बेरोजगार असल्याने त्यांना पोट भरण्याकरिता रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा ,तिसऱ्या टप्प्यातील उर्वरित गावांचे पुरामुळे भरपूर नुकसान होत असल्यामुळे त्या गावांचे तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे ,75% शेतजमीन गेलेले अशा गावांचे शासन निर्णयानुसार पुनर्वसन करण्यात यावे, करिता गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तप अशासकीय समितीचे सदस्य भाऊ कातोरे ,शेषराज रामटेके, अतुल राखोरते ,सुनील भोपे ,दिलीप मडामे, प्रमिला शहारे, मंगेश पडोळे, कमलेश सुखदेवे ,बाळू ठवकर ,पुरुषोत्तम गायधने, मयुरी सुखदेवे, दिनेश राघोरते,महेश नखाते आमरण उपोषणाला बसलेले आहेत.

Previous articleवृद्धांना ओझे न समजता कर्तव्य म्हणून सांभाळा ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त –अमृत बन्सोड यांचे प्रतिपादन
Next articleवंचित बहुजन आघाडी व एकलव्य सेना तर्फे आरक्षण बचाव जनसंवाद यात्रेचा साकोलीत समारोप
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here